शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : जीएसटीमुळेच शुल्क आकारण्याचा निर्णय : सुदिन ढवळीकर, बांबोळी प्रश्न लवकरच निकाली निघेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 12:13 IST

गोवा-बांबोळी येथील मेडिकल कॉलेजमध्ये सिंधुदुर्गमधील रुग्णांकडून फी आकारली जात आहे. त्याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना भेटून याबाबत चर्चा केली आहे. पुन्हा एकदा चर्चा करेन. मात्र हा सर्व घोळ जीएसटीमुळे झाला आहे. राज्य चालविण्यास जो पैसा लागतो तो येत नसल्याने हे पाऊल उचलावे लागले, अशी जाहीर कबुली गोव्याचे बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. ते सावंतवाडी येथे एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते. ​​​​​​​

ठळक मुद्देजीएसटीमुळेच शुल्क आकारण्याचा निर्णय : सुदिन ढवळीकरबांबोळी प्रश्न लवकरच निकाली निघेलशस्त्रक्रियेसाठी पैसे आकारले जाणार नाहीत याची खबरदारी घेऊ

सावंतवाडी : गोवा-बांबोळी येथील मेडिकल कॉलेजमध्ये सिंधुदुर्गमधील रुग्णांकडून फी आकारली जात आहे. त्याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना भेटून याबाबत चर्चा केली आहे. पुन्हा एकदा चर्चा करेन. मात्र हा सर्व घोळ जीएसटीमुळे झाला आहे. राज्य चालविण्यास जो पैसा लागतो तो येत नसल्याने हे पाऊल उचलावे लागले, अशी जाहीर कबुली गोव्याचे बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. ते सावंतवाडी येथे एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.यावेळी मंत्री ढवळीकर म्हणाले, विश्वजित राणे हे आरोग्यमंत्री झाल्यावरच फीचा प्रश्न येतो असे काही नाही. मात्र मायनिंगमधून जो महसूल यायला पाहिजे तो येत नाही. तसेच जीएसटीमुळे सगळीकडे घोळ झाला आहे. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला.

मात्र गोवा-बांबोळी मेडिकल कॉलेजमध्ये जे काही शुल्क आकारले जात आहे त्याबाबत निश्चित असा मार्ग काढण्यात येणार आहे. मी स्वत: पुन्हा एकदा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा करेन आणि त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करीन. हा शुल्काबाबतचा वाद लवकरच मिटेल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतून गोवा सरकारला पैसे देण्याचे मान्य केले आहे. त्याबाबत येथील पालकमंत्री दीपक केसरकर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घ्यावा. त्यासाठी त्यांच्यावर दबाव आणावा. पत्रकारांनीही आपले एक निवेदन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठवावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. तसेच ब्राह्मण मंडळही आपले निवदेन पाठवेल, असेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.शस्त्रक्रियेसाठी पैसे आकारले जाणार नाहीत याची खबरदारी घेऊसिंधुदुर्ग व गोव्याचे नाते लांबचे नाही. जर हे मेडिकल कॉलेज उभारताना येथील मंडळींनीही प्रयत्न केला असेल तर त्यांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे. यावर अभ्यास करू आणि शुल्क फक्त आकारतील, पण शस्त्रक्रियेसाठी पैसे आकारले जाणार नाहीत याची खबरदारी निश्चित घेऊ, असेही ढवळीकर यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गGSTजीएसटीgoaगोवाministerमंत्री