शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिंधुदुर्ग : कोकणात शेळ्या-मेंढ्यांची कारवणी पद्धत आजही टिकून, मेंढपाळ गावोगावी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 10:54 IST

रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीची सुपिकता कमी होऊ लागल्याने सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परिणामी कोकणात पूर्वीपासून चालत आलेली शेतात शेळ्या-मेंढ्या बसविण्याची कारवणी पद्धत आजही टिकून आहे. जिल्ह्याच्या खलाट पट्ट्यातील मेंढपाळ आपल्या फौजफाट्यासह कारवाणीसाठी गावोगाव दाखल होऊ लागले आहेत.

ठळक मुद्देशेळ्या-मेंढ्यांची कारवणी पद्धत आजही टिकूनमेंढपाळ गावोगावी दाखल कोकणातील पूर्वपरंपरागत प्रथा

मिलिंद डोंगरे 

सिंधुदुर्ग : रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीची सुपिकता कमी होऊ लागल्याने सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परिणामी कोकणात पूर्वीपासून चालत आलेली शेतात शेळ्या-मेंढ्या बसविण्याची कारवणी पद्धत आजही टिकून आहे. जिल्ह्याच्या खलाट पट्ट्यातील मेंढपाळ आपल्या फौजफाट्यासह कारवाणीसाठी गावोगाव दाखल होऊ लागले आहेत.

पूर्वमशागतीसाठी पूर्वीच्या काळी रासायनिक खते नसल्याने लोक सेंद्रिय पद्धतीने शेती करीत असत. शेण व पालापाचोळ्यापासून बनविलेले खत शेतीसाठी वापरत असत. परंतु जसजशी शेती तंत्रज्ञानात प्रगती होत गेली तसतशी रासायनिक खते उपलब्ध होत गेली. रासायनिक खतांमुळे शेतीच्या उत्पन्नात वाढ होत गेली.

हे खरे असले तरी या खतांचा बेसुमार वापर होऊ लागल्याने त्याचा विपरीत परिणाम जमिनीच्या सुपिकतेवर होऊ लागला. त्यामुळे अलीकडे सेंद्रिय शेतीवर भर दिला जात आहे. जमिनीची सुपिकता वाढविणारी कारवणी पद्धत पूर्वीपासूनच कोकणात आहे.कारवणी म्हणजे नेमके काय?साधारणपणे हिवाळा सुरू झाला की, मेंढपाळ आपल्या शेळ्या-मेंढ्यांचा फौजफाटा घेऊन गावोगावी भटकंती करीत असतात. शेतकरी आपल्या शेतात मेंढ्या बसवून घेतात. या शेळ्या-मेंढ्यांचे मलमूत्र शेतात पडते. त्यालाच कारवणी म्हणतात. त्याने शेतीची सुपिकता वाढत असल्याचे शेतकरी सांगतात.

शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्यांचा प्रश्न सुटतोलेंडीखताला फार मोठी मागणी असते. शेतीबरोबरच फळबागांना हे खत वापरले जाते. या खतामुळे जमिनीचा पोत सुधारत असल्याने कारवणीसाठी शेतकरी आग्रही असतात. एका रात्री शेळ्या-मेंढ्या शेतात बसविण्यासाठी तांदूळ किंवा पैसे अशी त्यांची बिदागी असते. पाऊस पडेपर्यंत हे मेंढपाळ गावोगावी भटकंती करीत असतात. त्यातून त्यांच्या उदरनिर्वाहाबरोबरच शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्यांचा प्रश्न सुटतो. यात हजारो रुपयांची उलाढालही होत असते.शेळ्या-मेंढ्यांसोबत शेतातच संसारअर्थात यात मेंढपाळांना प्रचंड मेहनत करावी लागते. थंडी, वारा, कडाक्याचे ऊन सहन करीत ते गावोगावी भटकंती करीत असतात. शेळ्या-मेंढ्यांबरोबरच त्यांना शेतात संसार थाटावा लागतो. पावसाळा सुरू होण्याअगोदर ते आपल्या घरी परततात. एकेक मेंढपाळांकडे २०० ते २५० मेंढ्या असतात. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी