शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

सिंधुदुर्ग : भावासह पुतण्याला बांबूच्या दांड्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 18:10 IST

घराच्या पडवीत मुलासमवेत नारळ सोलत बसलेल्या उत्तम यशवंत पाटील (६२) आणि पुतण्या स्वप्नील उत्तम पाटील या दोघांना संतोष यशवंत पाटील याने बांबूच्या दांड्याने बेदम मारहाण केली. तसेच मातीची वीट फेकून मारली. या मारहाणीत उत्तम पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देभावासह पुतण्याला बांबूच्या दांड्याने मारहाणठार मारून टाकण्याचीही धमकी : मारहाणीत एक गंभीर जखमी

मालवण : घराच्या पडवीत मुलासमवेत नारळ सोलत बसलेल्या उत्तम यशवंत पाटील (६२) आणि पुतण्या स्वप्नील उत्तम पाटील या दोघांना संतोष यशवंत पाटील याने बांबूच्या दांड्याने बेदम मारहाण केली. तसेच मातीची वीट फेकून मारली. या मारहाणीत उत्तम पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संतोष हा उत्तम पाटील यांचा लहान भाऊ आहे. ही मारहाण शुक्रवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास झाली.मसुरे पोलीस दूरक्षेत्राकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर उत्तम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपण व मुलगा दोघेही घराशेजारी असलेल्या ब्राह्मण देवस्थानाच्या ठिकाणी ब्राम्हण भोजन करण्यासाठी माडाच्या बागेतून नारळ काढून घरी आणले होते.

घराच्या पुढच्या पडवीत बसून नारळ सोलत असताना लहान भाऊ संतोष हा त्याठिकाणी आला व काहीही कारण नसताना त्याने शिवीगाळ करत तू नारळ कशाला सोलतोस? असे बोलून मारहाण करण्यास सुरुवात केली. घराच्या बाहेर असलेला बांबूचा दांडा घेऊन माझ्या डोक्यावर व उजव्या हाताच्या मनगटावर मारून गंभीर दुखापत केली.मी व माझा मुलगा घाबरून पळून जात असताना संतोष याने पाठलाग करून स्वप्नील याच्या पाठीवर मारहाण केली. तसेच संतोष याने मातीची वीट फेकून मारली. या मारहाणीत मला गंभीर दुखापत झाली, असेही म्हटले आहे.पोलिसांत गुन्हा दाखलसंतोष याने तू व तुझा मुलगा घरात आल्यास तुम्हांला ठार मारून टाकीन अशी धमकीही यावेळी दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे पोलीस दूरक्षेत्राचे संतोष नांदोसकर हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग