शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : चौकुळ येथे घराची तोडफोड, अज्ञाताकडून कृत्य : वार्षिक जत्रोत्सवावेळी प्रकार, दोन लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 17:15 IST

चौकुळ येथे सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक अरुण गावडे यांच्या ग्रामीण पर्यटन या संकल्पनेसाठी बांधण्यात आलेल्या घराची अज्ञाताकडून घरातील फरशीसह सामानाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. जत्रोत्सवाच्या रात्री ही घटना घडली. यात अरुण गावडे यांचे सुमारे २ लाखांचे नुकसान करण्यात आले.

ठळक मुद्देअरुण गावडे यांचे सुमारे २ लाखांचे नुकसान डागडुजी करुन पर्यटकांसाठी खुले करणार होते घर

आंबोली : चौकुळ येथे सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक अरुण गावडे यांच्या ग्रामीण पर्यटन या संकल्पनेसाठी बांधण्यात आलेल्या घराची अज्ञाताकडून घरातील फरशीसह सामानाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. जत्रोत्सवाच्या रात्री ही घटना घडली. यात अरुण गावडे यांचे सुमारे २ लाखांचे नुकसान करण्यात आले.सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक अरुण गावडे येथे ग्रामीण पर्यटन रुजवून नवी गाववाले बहुउद्देशीय पर्यटन संस्था, आंबोली-चौकुळ व गेळे या संस्थेद्वारे प्रयत्न करत आहेत. त्यांनी ग्रामीण पर्यटनसाठी, पर्यटकांसाठी निवासस्थान करण्यासाठी आपल्या जागेत नेनेवाडी येथे सर्व्हे क्रमांक ७४ येथे घर बांधले होते. त्याची डागडुजी करुन येत्या २ दिवसांत पर्यटकांसाठी ते घर खुले करणार होते.

मात्र, जत्रोत्सवाचा फायदा घेत अज्ञाताने बुधवारी रात्री तेथे कोणीही नसल्याची संधी साधत दरवाजा तोडून आतील ठेवण्यात आलेल्या सामानासोबत घरातील सर्व खोल्यातील व बाथरूमसहीत बसवलेल्या फरशीचे अक्षरश: तुकडे-तुकडे केले. हे करताना ती अज्ञात व्यक्ती जखमी ही झाली असल्याची शक्यता असून तेथे घरात रक्ताचे सर्वत्र डाग पसरले आहेत.

या घटनेची माहिती गुरूवारी सकाळी घरी आल्यावर अरुण गावडे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी लागलीच आंबोली पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यावर पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वास सावंत व कॉन्स्टेबल गुरुदास तेली यांनी पाहणी केली.

यावेळी अरुण गावडे यांनी घरातील बसवलेली किमती फरशी, शिल्लक असलेले १५ बॉक्स फरशी, बेसीन, पाईप लाईन यांची तोडफोड तर आतील कामगारांचे दोन कटर मशीन, ग्राइंडर, सौर उर्जा संच, पेट्रोल जनरेटर आदी सामानाची तोडफोड झाल्याची तक्रार दिली आहे.

दोन-तीन वर्षापूर्वीही तोडफोड करण्यात आली होती. त्यावेळी एका संशयीताबद्दल तक्रार दिली होती. असा संशय अरुण गावडे यांनी व्यक्त केला आहे. तर तोडफोड झाल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी पाहणी केली. अधिक तपास पोलीस करत आहेत.घरातील फरशीची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrimeगुन्हा