शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :  दारिस्तेतील तरुणीचा दिगवळेतील नदीत मृतदेह, आत्महत्या की घातपात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 17:06 IST

कणकवली तालुक्यातील दारिस्ते-गुरववाडी येथील अंकिता रवींद्र गुरव (२०) हिचा मृतदेह दिगवळे येथील नदीपात्रात झुडपांना अडकलेला आढळून आला. ती रविवारी दुपारपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास आढळला. मात्र, तिची आत्महत्या की घातपात याबाबत चर्चेला परिसरात उधाण आले आहे.

ठळक मुद्देदारिस्तेतील तरुणीचा दिगवळेतील नदीत मृतदेहचर्चेला उधाण : आत्महत्या की घातपात याबाबत तर्कवितर्क

सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील दारिस्ते-गुरववाडी येथील अंकिता रवींद्र गुरव (२०) हिचा मृतदेह दिगवळे येथील नदीपात्रात झुडपांना अडकलेला आढळून आला. ती रविवारी दुपारपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास आढळला. मात्र, तिची आत्महत्या की घातपात याबाबत चर्चेला परिसरात उधाण आले आहे.तिचे वडील रवींद्र गुरव यांनी आपली मुलगी अंकिता बेपत्ता असल्याची तक्रार रविवारी सायंकाळी पोलीस स्थानकात दिली होती. सायंकाळनंतर नदीपात्रात शोधमोहीम सुरू होती. पाण्यात बुडून मृत्यू अशी पोलिसांत नोंद आहे. अंकिताने आत्महत्या केली की ती पाय घसरून नदीत पडली याबाबत तर्कवितर्क लढविले जात असून तिचा कुणीतरी घातपात केला असावा, अशी चर्चाही परिसरात सुरू आहे.अंकिता ही कणकवलीतील एका झेरॉक्स सेंटरमध्ये कामाला होती. रविवार असल्यामुळे झेरॉक्स सेंटरच्या मालकाने तिला दुपारी १२.३० च्या दरम्यान घरी जायला सोडले. ती सायंकाळपर्यंत घरी न आल्यामुळे नातेवाईकांनी झेरॉक्स सेंटरच्या मालकांकडे चौकशी केली. अंकिता दुपारी १२.३० वाजताच घरी गेल्याचे झेरॉक्स सेंटरच्या मालकाने सांगितले.सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास दिगवळे-गावडेवाडी येथील के. टी. बंधाऱ्यापासून नदीपात्रात २०० मीटर अंतरावर पळसकोंड येथे अंकिताचा मृतदेह शेरणीच्या झाडाला अडकलेला आढळला. अंकिताच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ व एक विवाहित बहीण असा परिवार आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.शोधमोहिमेला पुन्हा सुरुवातअंकिता रविवारी दुपारी झेरॉक्स सेंटरमधून घरी यायला निघाली तर सायंकाळपर्यंत घरी का आली नाही म्हणून पालक चिंतेत पडले. शेवटी ग्रामस्थांनी नदीत शोधमोहीम सुरू केली. मात्र रात्र झाल्यामुळे नदीत काही दिसत नसल्यामुळे रात्री ८.३0 च्या दरम्यान शोधमोहीम थांबविली. सोमवारी सकाळी ६.३0 नंतर शोधमोहिमेला पुन्हा सुरुवात करण्यात आली. 

टॅग्स :Crimeगुन्हाsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस