शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : सहाय्यक अभियंत्याचा मृतदेह आढळला, बुडून मृत्यू की आत्महत्या याबाबत साशंकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 16:34 IST

गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेले महावितरण कंपनीचे वालावल विभागाचे सहाय्यक अभियंता युवराज चंद्रकांत पिंपळे (३५, मूळ रा. गांधीनगर-अक्कलकोट) यांचा मृतदेह बुधवारी मालवण तालुक्यातील काळसे येथील नदीपात्रात आढळून आला. पिंपळे यांनी आत्महत्या केली की त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला हे स्पष्ट झाले नाही.

ठळक मुद्देसहाय्यक अभियंत्याचा मृतदेह आढळला बुडून मृत्यू की आत्महत्या याबाबत साशंकता

सिंधुदुर्ग : गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेले महावितरण कंपनीचे वालावल विभागाचे सहाय्यक अभियंता युवराज चंद्रकांत पिंपळे (३५, मूळ रा. गांधीनगर-अक्कलकोट) यांचा मृतदेह बुधवारी मालवण तालुक्यातील काळसे येथील नदीपात्रात आढळून आला. पिंपळे यांनी आत्महत्या केली की त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला हे स्पष्ट झाले नाही.युवराज पिंपळे महावितरण कंपनीच्या वालावल विभागात कार्यरत होते. २२ जून रोजी पहाटे साडेपाच वाजल्यापासून ते बेपत्ता होते. गांधीनगर-अक्कलकोट येथील पिंपळे नोकरीनिमित्त कुडाळ येथील माटेवाडा भागात राहत होते. गुरूवारी रात्री घरगुती कारणावरून वाद झाला होते. त्यानंतर ते रोजच्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. सकाळी त्यांची पत्नी वैशाली त्यांना उठविण्यासाठी गेली असता ते खोलीत नव्हते.

त्यानंतर ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांची शोधाशोध करण्यात आली होती. मात्र ते सापडले नाहीत. त्यामुळे बेपत्ताची तक्रार कुडाळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली, अशी माहिती त्यांची पत्नी वैशाली हिने दिली.या दरम्यान बुधवारी नेरूरपार येथील नदीपात्रात अज्ञाताचा मृतदेह तरंगताना तेथील ग्रामस्थांना दिसून आला. याबाबत पोलिसांना माहिती देताच मालवण पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. अधिक तपास केला असता तो मृतदेह बेपत्ता असलेल्या पिंपळे यांचा असल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मालवण येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.रोज मॉर्निंग वॉकपिंपळे हे रोज पहाटे मार्निंग वॉकला जात होते. कुडाळ भंगसाळ नदीकिनाऱ्यावरून जाताना त्यांचा पाय घसरून नदीपात्रात बुडून मृत्य झाला की, त्यांनी आत्महत्या केली, हे उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrimeगुन्हा