प्रल्हादपूर, चांदई, तीर्थपुरीत तिघांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:50 AM2018-05-31T00:50:32+5:302018-05-31T00:50:32+5:30

वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाला. भोकदरन तालुक्यातील हसनाबाद, प्रल्हादपूर, तसेच घनसावंगी तालुक्यातील जोगळादेवी शिवारात या घटना घडल्या.

Three drowned in Pralhadpur, Chandai and Teerthapuri | प्रल्हादपूर, चांदई, तीर्थपुरीत तिघांचा बुडून मृत्यू

प्रल्हादपूर, चांदई, तीर्थपुरीत तिघांचा बुडून मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन/तीर्थपुरी : वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाला. भोकदरन तालुक्यातील हसनाबाद, प्रल्हादपूर, तसेच घनसावंगी तालुक्यातील जोगळादेवी शिवारात या घटना घडल्या.
कपडे धुण्यासाठी खदानीवर गेलेल्या अकरा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील प्रल्हादपूर येथे घडली. पल्लवी दगडू शिंदे (११,रा. नांजावाडी) असे मृत मुलीचे नाव आहे.
पल्लवी शिंदे प्रल्हादपूर येथे मामाच्या घरी आली होती. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ती मामाच्या मुलीसोबत गावालगतच्या खदानीवर कपडे धुण्यासाठी गेली. कपडे धुताना तोल गेल्यामुळे ती पाण्यात पडली. सोबतच्या मुलीने आरडाओरडा केला. आजूबाजूच्या काही नागरिकांनी खदानीकडे धाव घेत पल्लवीला पाण्याबाहेर काढून भोकरदन येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तीर्थपुरीपासून जवळ असलेल्या जोगलादेवी बंधाऱ्यात माऊली श्रीकिसन खोजे (१६,रा. जोगलादेवी) हा तरुण दुपारी तीनच्या सुमारास पोहण्यासाठी उतरला. मात्र, त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अन्य एका घटनेत भोकरदन तालुक्यातील चांदईएक्को येथील समाधान जनार्दन तळेकर (१८) हा मंगळवारी दुपारनंतर गावातील विहिरीवर पोहण्यासाठी गेला असता, त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक चव्हाण तपास करीत आहेत.

Web Title: Three drowned in Pralhadpur, Chandai and Teerthapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.