शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : अर्धनग्न महिलेचा मृतदेह सापडला, मालवण येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 13:37 IST

मालवण बंदरजेटी परिसरातील समुद्रात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. ही महिला अर्धनग्न स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. याशिवाय तिच्या दोन्ही डोळ्यांतून रक्तस्राव झाल्याच्या खुणा दिसून आल्याने ही आत्महत्या की घातपात? याबाबतच्या चर्चांना ऊत आला होता. 

ठळक मुद्देअर्धनग्न महिलेचा मृतदेह सापडला, मालवण येथील घटना महिलेच्या डोळ्यांनाही गंभीर दुखापत झाल्याच्या खुणा

मालवण : मालवण बंदरजेटी परिसरातील समुद्रात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. ही महिला अर्धनग्न स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. याशिवाय तिच्या दोन्ही डोळ्यांतून रक्तस्राव झाल्याच्या खुणा दिसून आल्याने ही आत्महत्या की घातपात? याबाबतच्या चर्चांना ऊत आला होता. मालवण बंदरजेटी परिसरात सुमारे ३५ ते ४० वयोगटातील अज्ञात महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत समुद्रात तरंगताना स्थानिक मच्छिमार व नागरिकांना दिसून आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन समुद्रात तरंगणाऱ्या महिलेला किनारी आणले. याबाबतची माहिती पोलीस पाटील रामचंद्र चव्हाण यांनी पोलिसांत दिली.यावेळी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक डॉ. बालाजी सवंडकर, हवालदार निलेश सोनावणे, संतोष गलोले, गंगा येडगे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मृतदेहाची ओळख पटली नव्हती.मालवण समुद्रकिनारी सकाळी आढळून आलेल्या महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह तरंगताना दिसून आला. या महिलेच्या डोळ्यावरही रक्तस्राव झाल्याच्या खुणा दिसून येत होत्या. हीमहिला ३५ ते ४० वयोगटातील असून तिचा वर्ण गोरा आहे. तिच्या अंगावरील उपलब्ध कपड्यांवरून तिने पंजाबी ड्रेस परिधान केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.तर्कवितर्कांना ऊत; पोलिसांचे नागरिकांना आवाहनजखमी व अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडल्याची बातमी पसरताच बंदरजेटी किनारी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या महिलेच्या अंगावर अर्धे कपडेच असल्याने तसेच चेहऱ्यांवर रक्ताच्या खुणा दिसून आल्याने बघ्यांनी घातपाताचीही शक्यता वर्तवली. तर काहींनी नैराश्यातून त्या अज्ञात महिलेने आत्महत्या केली असावी, असेही तर्क लढविले होते. याबाबत पोलिसांनी सावध भूमिका घेतली होती.महिला अनोळखी असल्याने ती पर्यटक किंवा बाहेरगावची असू शकते, असा अंदाज पोलिसांचा आहे. त्याप्रमाणे त्यांनी अन्य पोलीस ठाण्यातून कोणी बेपत्ता आहे का? याबाबत माहिती घेतली. सोशल मीडियावर अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला असल्याबाबत पोस्ट टाकून ती महिला पर्यटक असल्यास कोणाच्या हॉटेल, लॉजवरून बेपत्ता झाली असल्यास मालवण पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मृतदेहाची ओळख पटली नव्हती. 

टॅग्स :Crimeगुन्हाsindhudurgसिंधुदुर्ग