शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

सिंधुदुर्ग : बनसोडेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, सहा जणांची टोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 17:31 IST

कुडाळ तालुक्यातील निरूखे येथील व्यापारी रामदास करंदीकर यांच्या घरावर सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाच्या मदतीने दरोडा टाकून सुमारे साडेपाच लाख रुपये लुटणाऱ्या पुणे येथील सहा जणांच्या टोळीतील फरार असलेल्या पाच आरोपींपैकी अनिल बनसोडे याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्याने बनसोडेलाही लवकरच अटक होण्याची दाट शक्यता आहे.

ठळक मुद्देबनसोडेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, सहा जणांची टोळी निरूखे येथील व्यापारी रामदास करंदीकर यांच्या घरावरील दरोडा प्रकरण

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील निरूखे येथील व्यापारी रामदास करंदीकर यांच्या घरावर सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाच्या मदतीने दरोडा टाकून सुमारे साडेपाच लाख रुपये लुटणाऱ्या पुणे येथील सहा जणांच्या टोळीतील फरार असलेल्या पाच आरोपींपैकी अनिल बनसोडे याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्याने बनसोडेलाही लवकरच अटक होण्याची दाट शक्यता आहे.या टोळीला मदत केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अमोल दिवाकर राऊत (४३, रा. मालवण) व सचिन नामदेव पाटील (३६, रा. पिंगुळी-कुडाळ) या दोघांनाही न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी पत्रकारांना दिली.कुडाळ तालुक्यातील निरूखे येथील शेती व्यावसायिक रामदास करंदीकर यांच्या घरावर २२ एप्रिल रोजी ८ वाजता पुणे येथील तोतया आयकर विभागाचा अधिकारी श्रीजीत रमेशन व त्याच्या पाच साथीदारांनी सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाच्या मदतीने दरोडा टाकून करंदीकर यांच्या घरातील सुमारे साडेपाच लाख रुपयांची रक्कम चोरून नेली होती.

करंदीकर यांच्या तक्रारीनुसार पुणे येथील श्रीजीत रमेशन व त्याचे साथीदार राजबहाद्दूर यादव, अनिल बनसोडे, इरफान व रमेशन याचा अंगरक्षक पुणे ग्रामीण पोलीस ठाण्याचे मोरे व आनंद सदावर्ते या सहा जणांवर गुन्हे दाखल केले होते.गुन्हा दाखल असलेला आनंद सदावर्ते हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे तर या पुण्याच्या गँगला माहिती देऊन सहकार्य केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या पिंगुळी-गुढीपूर येथील सचिन पाटील व मालवण येथील अमोल राऊत या दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.या प्रकरणातील उर्वरित पाच फरार आरोपींना अटक करण्यासाठी तपासकाम सुरू असतानाच फरार आरोपींपैकी बनसोडे याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र आरोपीला अटकपूर्व जामीन मिळू नये याकरिता पोलीस प्रशासनाने म्हणणे न्यायालयात मांडले होते.

दरम्यान, जिल्हा सत्र न्यायालयाने बनसोडे याचा अर्ज फेटाळला आहे. या दरोड्यातील मुख्य सूत्रधार श्रीजीत रमेशन यानेही जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने रमेशनचाही अर्ज फेटाळला. अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यासाठी फरार आरोपी बनसोडे जिल्हा न्यायालयात आला होता का? त्याला अटक केव्हा होणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcrimeगुन्हे