शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : सेस वसुलीवरून बांद्यात खडाजंगी, अधिकारी, व्यापारी एकमेकांसमोर भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 16:43 IST

बांदा सोमवार आठवडा बाजारात शहरातील काजू व्यापाऱ्यांच्या माल वाहतुकीच्या गाड्या अडविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी बंदुकधारी पोलीस बंदोबस्तात दाखल झाल्याने शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली.

ठळक मुद्देसेस वसुलीवरून बांद्यात खडाजंगी, अधिकारी, व्यापारी एकमेकांसमोर भिडले आठवडा बाजारात तणावाची स्थिती

बांदा : बांदा सोमवार आठवडा बाजारात शहरातील काजू व्यापाऱ्यांच्या माल वाहतुकीच्या गाड्या अडविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी बंदुकधारी पोलीस बंदोबस्तात दाखल झाल्याने शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली.

यावेळी काजू व्यापारी व अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. व्यापाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे न देताच बाजार समितीचे सचिव डी. एस. परब सहकाऱ्यांसमवेत माघारी परतले.

शेतकऱ्यांना काजू विक्रीचा समाधानकारक दर हा व्यापाऱ्यांमुळेच मिळतो. मात्र, बाजार समितीच्या अन्यायकारक सेस आकारणीमुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. बाजार समितीने ही अन्यायकारक सेस वसुली थांबवावी. अन्यथा, शेतकऱ्यांकडून काजू खरेदी बंद करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला.व्यापाऱ्यांकडून थेट सेस वसुली करण्याच्या इराद्याने सोमवारी सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव परब, निरीक्षक दत्ताराम मठकर, संजय रावराणे, लिपीक सिध्देश नाईक बांदा बाजारपेठेत दाखल झाले. बाजार समिती ही व्यापारी व काजू कारखानदार या दोघांकडूनही सेसची वसुली करते. ही वसुली अन्यायकारक असल्याचे व्यापारी वळंजू यांनी सांगितले.

बाजार समितीने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता व्यापाऱ्यांकडून सेस न आकारता थेट कारखानदारांकडून आकारावा. तरच व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना काजू खरेदीमागे दोन रूपये ज्यादा दर देणे शक्य होईल असे स्पष्ट केले. मात्र, सेसची आकारणी हा निर्णय आपल्या अखत्यारित नसून हा निर्णय बाजार समितीच्या संचालक मंडळामार्फत घेण्यात येतो असे परब यांनी सांगितले.

बांदा येथील व्यापाऱ्यांनी यावेळी सेस वसुलीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. मात्र, कोणत्याही प्रश्नांना अधिकारी समर्पक उत्तरे देऊ शकले नाहीत. अखेर सेस वसुली न करताच अधिकारी माघारी परतले. यावेळी व्यापारी योगेश काणेकर, भाऊ वळंजू, भैय्या गोवेकर, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, राजेश येडवे, संदेश पावसकर, गौरेश गवंडे आदींसह व्यापारी उपस्थित होते.

पोलीस आणल्याने व्यापारी संतप्तवसुलीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी बांदा येथे वसुलीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी सोबत बंदुकधारी पोलीस आणले होते. त्यामुळेच व्यापारी संतप्त झाले. व्यापाऱ्यांना घाबरविण्यासाठी की आपल्या संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त आणलात असा सवाल योगेश काणेकर यांनी उपस्थित केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMarketबाजार