शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : सावंतवाडीतील अत्याचार प्रकरण : पोलीस चेतन गुप्ताचे आश्रयदाते शोधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 15:20 IST

लग्नाचे आमिष दाखवून सावंतवाडीतील प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या मुलाने परिसरातीलच एका मुलीवर गेली दोन वर्षे अत्याचार केले होते. याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी चेतन अशोक गुप्ता याला तब्बल सतरा दिवसांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देसावंतवाडीतील अत्याचार प्रकरण पोलीस चेतन गुप्ताचे आश्रयदाते शोधणारसतरा दिवसांनी ताब्यात, पाच दिवसांची पोलीस कोठडी

सावंतवाडी : लग्नाचे आमिष दाखवून सावंतवाडीतील प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या मुलाने परिसरातीलच एका मुलीवर गेली दोन वर्षे अत्याचार केले होते. याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी चेतन अशोक गुप्ता याला तब्बल सतरा दिवसांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

येथील न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. चेतन गुप्ता हा सतरा दिवस कोणाच्या आश्रयाला होता, त्या आश्रयदात्याचा पोलीस शोध घेणार आहेत.संशयित आरोपी चेतन गुप्ता याची पीडित मुलीशी २०१५ मध्ये फेसबुकवरून ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत गुप्ता याने मी तुझ्याशी लग्न करतो, असे तिला सांगून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले होते. यानंतर तो त्या मुलीला सावंतवाडीतील आपल्या फ्लॅटवर तसेच शिरोडा वेळागर येथील समुद्रकिनारी घेऊन जाऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता.हा प्रकार गेली दोन वर्षे सुरू होता. पीडित मुलीला चेतन याचे लग्न झाल्याची माहिती मिळताच तिने त्याच्याशी प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या संशयित आरोपी चेतन याने याची वाच्यता तू कुठे बाहेर केलीस तर तुला सोडणार नाही. तुला व तुझ्या वडिलांना संपवून टाकेन, अशी धमकी दिली होती. एवढेच नाही तर आरोपीने अलीकडेच आपल्यासोबतचे फोटो पीडितेच्या भावाला पाठविले होते. त्यामुळे हा सर्व प्रकार उजेडात आला होता.आरोपी चेतन गुप्ता याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आरोपीने गुन्ह्यात वापरलेली कार तसेच मुलीवर कुठे कुठे नेऊन अत्याचार केले याचा शोध घेणार आहेत. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने कोणाकोणाकडे आश्रय घेतला याचाही पोलीस शोध घेणार आहेत. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लक्ष्मण गवस करीत आहेत.आरोपीच्या आई, बहिणीला न्यायालयाकडून जामीन मंजूरपीडित मुलीने पोलिसांकडे चेतन गुप्ताच्या विरोधात अत्याचाराची, तर त्याच्या आई व बहिणीविरोधात मारहाणीची तक्रार दिली होती. यात आरोपी चेतन याच्या आई व बहिणीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.तर मुख्य आरोपीने या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी जिल्हा न्यायालय तसेच उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. पण उच्च न्यायालयाने आरोपीला जिल्हा न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोपी सोमवारी न्यायालयासमोर हजर झाला होता.

टॅग्स :Crimeगुन्हाsindhudurgसिंधुदुर्ग