शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : जिल्हा परिषदेच्या 21 कोटी 7 लाख रूपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 17:48 IST

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सन 2017-18 च्या 21 कोटी 7 लाख रूपयांच्या अंतिम सुधारित अर्थसंकल्पास तर आगामी सन 2018-19 च्या 16 कोटी रूपयांच्या मुळ अर्थसंकल्पास आजच्या वित्त समिती सभेत मान्यता देण्यात आली. वित्त व लेखा अधिकारी महेश कारंडे यांनी हा अर्थसंकल्प सभागृहासमोर सादर केला.यावर्षीच्या अंतिम सुधारित अर्थसंकल्पास गतवर्षीच्या तुलनेत तब्बल अडीच कोटी रुपयांचा कट लागला आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 21 कोटी 7 लाख रूपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता गतवर्षीच्या तुलनेत अडीच कोटी रूपयांचा "कट"

सिंधुदुर्ग : जिल्हा परिषदेच्या सन 2017-18 च्या 21 कोटी 7 लाख रूपयांच्या अंतिम सुधारित अर्थसंकल्पास तर आगामी सन 2018-19 च्या 16 कोटी रूपयांच्या मुळ अर्थसंकल्पास आजच्या वित्त समिती सभेत मान्यता देण्यात आली. वित्त व लेखा अधिकारी महेश कारंडे यांनी हा अर्थसंकल्प सभागृहासमोर सादर केला. यावर्षीच्या अंतिम सुधारित अर्थसंकल्पास गतवर्षीच्या तुलनेत तब्बल अडीच कोटी रुपयांचा कट लागला आहे.जिल्हा परिषद वित्त समितीची मासिक सभा सभापती संतोष साटविलकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ.नाथ पै सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सदस्य रवींद्र जठार, महेंद्र चव्हाण, गणेश राणे, अनघा राणे, अनिषा दळवी, समिती सचिव तथा मुख्य वित्त व लेखा अधिकारी कारंडे , अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.आज संपन्न झालेल्या वित्त समिती सभेत चालू आर्थिक वर्षांचा अंतिम सुधारित व आगामी वर्षांचा मुळ अंदाजपत्रकाचा आराखडा मंजूरी साठी सभागृहात सादर करण्यात आला. समिती सचिव कारंडे यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले.

चालू आर्थिक वर्षांसाठी 16 कोटी रुपयांचा मुळ आराखडा मंजूर होता.त्यात वाढ करून 21 कोटी 7 लाखाचा सुधारित अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. तर आगामी सन 2018-19 या आर्थिक वर्षांसाठी 16 कोटीचा मुळ अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या दोन्ही आराखड्यांवर चर्चा होवून अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली.अडीच कोटी रूपयांचा "कट"यावर्षीच्या अंतिम सुधारित अंदाजपत्रकात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल अडीच कोटी रुपये कट लावला आहे. गतवर्षी अंतिम सुधारित अर्थसंकल्प हा 23 कोटी 50 लाख रूपयांचा अर्थ संकल्प मंजूर होता.तर यावर्षी 21 कोटी 7 लाखाच्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली आहे.मोबदल्या पुर्वीच कामाला सुरूवातमुंबई -गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामास वेग मिळाला आहे. या चौपदरीकरणात जिल्हा परिषदेची कोट्यावधी रुपयांची मालमत्ता यात जात असली तरी अद्यापही साधी दमडी सुद्धा जिल्हा परिषदेच्या खात्यावर जमा झाले नसल्याची बाब आजच्या सभेत उघड झाली.

हा मुद्दा सदस्य जठार यांनी उपस्थित केला होता. एकीकडे इतर जमिन मालकांना मोबदला मिळत असताना जिल्हा परिषदला मोबदला मिळत नसल्याचे कारण सभागृहात विचारण्यात आले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्ग