शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

सिंधुदुर्ग : धनगर समाजाचा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 17:01 IST

राज्य सरकारने धनगर समाजाला एसटी आरक्षणाचे दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्यामुळे धनगर समाजात संतापाची लाट उसळी घेऊ लागली आहे. त्यातूनच राज्यभर आरक्षणासाठी तीव्र आंदोलनाची पेटविली जात असून सिंधुदुर्गातील धनगर समाजातर्फे येत्या मंगळवारी(दि ९) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्देधनगर समाजाचा ९ ला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाआरक्षणाचा विषय प्रलंबित : राज्य सरकारने आश्वासन न पाळल्याने संताप

सिंधुदुर्ग : राज्य सरकारने धनगर समाजाला एसटी आरक्षणाचे दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्यामुळे धनगर समाजात संतापाची लाट उसळी घेऊ लागली आहे. त्यातूनच राज्यभर आरक्षणासाठी तीव्र आंदोलनाची पेटविली जात असून सिंधुदुर्गातील धनगर समाजातर्फे येत्या मंगळवारी(दि ९) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हा धनगर समाज एसटी आरक्षण कृती समितीची सभा ओरोस येथे जिल्हा मुख्य संघटक सुरेश झोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी किशोर वरक, नवलराज काळे, संजय शेळके, नवल गावडे, कानू शेळके, राजेश जानकर, रामचंद्र कोकरे, रितेश शेळके, रुपेश लांबर, रवि लांबर, अक्षय खरात, रामचंद्र काळे, विलास जंगले, भरत गोरे, रामचंद्र गोरे, रामचंद्र गावडे, रमेश शेळके, संजय खरात, विशाखा काळे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करुन तातडीने एसटी आरक्षण लागू करण्याचे आश्वासन भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २0१४ च्या निवडणुकीत दिले होते. भाजप सत्तेवर आल्यापासून सरकारकडे धनगर समाजाचे राज्यस्तरीय नेतृत्व आरक्षणाचा पाठपुरावा करीत आहे.

सरकारने नेमलेल्या टीस समितीने अहवालही सरकारला सादर केला आहे. तरीही त्याविषयी राज्य सरकार धनगरांच्या आरक्षणाबाबत निर्णय घेण्यास तयार नाही. त्यामुळेच आरक्षण मागणीसाठी ९ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला आहे.जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधवाच्या सहभागाने पारंपरिक गजनृत्य सादर करीत जिल्हा मुख्य संघटक, जिल्हा संघटक, तालुका संघटक यांच्या नेतृत्वाखाली ओरोस रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी या मोर्चात जिल्ह्यातील तमाम धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य संघटक सुरेश झोरे यांनी केले आहे.तालुकानिहाय संघटकांची नियुक्तीयासभेत तालुकानिहाय एक जिल्हा संघटकाची नेमणूक करण्यात आली. त्यानुसार सूर्यकांत बोडके (वैभववाडी), कानू शेळके(कुडाळ), संतोष पटकारे(दोडामार्ग), विलास जंगले (सावंतवाडी), संतोष साळसकर(देवगड), सुनिल वरक (मालवण), बाबू हुंबे (कणकवली) व रामा लांबर (वेंगुर्ले) आदींची जिल्हा संघटक निवड करण्यात आली आहे. तर तालुका संघटक म्हणून प्रत्येक तालुक्यासाठी दोन संघटक निवडण्यात आले आहेत.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग