शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : पहिल्या दिवशी ३0 उमेदवार अपात्र, पोलीस भरती प्रक्रियेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 18:14 IST

पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेला सोमवारपासून सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस कवायत मैदानावर प्रारंभ झाला आहे. सोमवारी पहिल्या दिवशी बँडमन या पदासाठी एकूण १२२५ उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी केवळ ४५८ उमेदवार उपस्थित राहिले. या उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली असता यातील ३० उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले.

ठळक मुद्देपहिल्या दिवशी ३0 उमेदवार अपात्र, पोलीस भरती प्रक्रियेला प्रारंभ महाआॅनलाईनकडून हॉल तिकीट न मिळाल्याने मोठी गैरसोय

सिंधुदुर्गनगरी : पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेला सोमवारपासून सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस कवायत मैदानावर प्रारंभ झाला आहे. सोमवारी पहिल्या दिवशी बँडमन या पदासाठी एकूण १२२५ उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी केवळ ४५८ उमेदवार उपस्थित राहिले.

या उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली असता यातील ३० उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले. या प्रक्रियेत ७६७ उमेदवार गैरहजर राहिले. या उमेदवारांना महाआॅनलाईनकडून हॉल तिकीट न मिळाल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली.दरम्यान, या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, हॉल तिकीटअभावी गैरसोय झालेल्या उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नसून अर्ज वैध असलेल्या सर्व उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेत समाविष्ट केले जाणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. रिक्त असणाऱ्या ७१ जागांसाठी १० हजार १७६ उमेदवारी अर्ज आॅनलाईन पद्धतीने दाखल झाले आहेत. सोमवारी पहाटे बँडमन पदासाठी मैदानी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. यासाठी १२२५ उमेदवारांना बोलविण्यात आले होते. यात ११३२ पुरूष तर ९३ महिला उमेदवारांचा समावेश होता. यापैकी प्रत्यक्ष हॉल तिकीट (प्रवेशपत्र) असणाऱ्यां ४५८ उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली.यावेळी हॉल तिकीट नसणाऱ्या उमेदवारांची मात्र तारांबळ उडाली. या उमेदवारांनी समन्वय अधिकारी शहा यांच्याकडे धाव घेत आपले म्हणणे मांडले. मात्र पहिल्या दिवशीतरी या उमेदवारांची प्रवेश पत्राऐवजी मैदानी चाचणी परीक्षा घेण्यात आली नव्हती. मात्र, याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मार्ग काढला असून अशा उमेदवारांना १५ मार्च रोजी पहाटे ५ वाजता मुख्यालय मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

उमेदवारांना मोफत अल्पोपहाराची सोयजिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या आदेशानुसार उपस्थित सर्व उमेदवारांना मोफत अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तर ओरोस फाट्यापासून पोलीस भरती ठिकाणापर्यंत उमेदवारांना ने- आण करण्यासाठी वाहनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.पहिल्या दिवशी २८ पुरूष, २ महिला अपात्रमैदानी परीक्षा घेण्यात आलेल्या ४५८ उमेदवारांपैकी ३० उमेदवार भरती प्रक्रियेतून बाहेर फेकले गेले आहेत. यात २८ पुरूष उमेदवार हे छाती व उंचीमुळे व दोन महिला उमेदवारांना उंचीमुळे अपात्र ठरविण्यात आले. ही परीक्षा नियोजित कार्यक्रमानुसार सुरू राहणार आहे.भरती प्रक्रिया पारदर्शकपोलीस भरती दरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भरती दरम्यान ड्रोन कॅमेरा व सीसीटीव्ही कॅमेरे यांचा वापर करण्यात येत आहे. मंत्रालयातील काही कर्मचारी या पोलीस भरतीसाठी तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे ही संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. 

सोमवारपासून येथील पोलीस कवायत मैदानावर पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या दरम्यान मैदानी चाचणी घेताना पोलीस कर्मचारी तर बाजूला एक पोलीस कर्मचारी हा क्षण कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहे.

महाआॅनलाईन कडून शेकडो उमेदवारांचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) न आल्याने या उमेदवारांना पहिल्या दिवशी मैदानी चाचणी परीक्षेला मुकावे लागले होते. ज्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत अशांनी आवेदन अर्जासहीत १५ मार्च रोजी पहाटे ५ वाजता ओरोस पोलीस मुख्यालय मैदानावर उपस्थित रहावे. ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र प्राप्त नाही अशा उमेदवारांची सत्यता पडताळून निर्णय दिला जाणार आहे- दीक्षितकुमार गेडाम,पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस