शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : १८२ बालके कुपोषणग्रस्त, आरोग्य विभागाचा सर्व्हे : जिल्हा कुपोषणमुक्तीपासून कोसो मैल दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 17:26 IST

सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी आजवर लाखो रुपये खर्च झाले असले तरी महिला व बालकल्याण विभागाला अद्यापही यश मिळालेले नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध अंगणवाड्यांमधून १८२ बालक कुपोषणाच्या विळख्यात सापडली असल्याचे धक्कादायक वास्तव आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे समोर आले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषण मुक्तीपासून अजूनही कोसो मैल दूर असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा कुपोषणमुक्तीपासून कोसो मैल दूर१८२ बालके कुपोषणग्रस्त, आरोग्य विभागाचा सर्व्हे माझी कन्या भाग्यश्री योजनेचा जिल्ह्यात एकही लाभार्थी नाही

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी आजवर लाखो रुपये खर्च झाले असले तरी महिला व बालकल्याण विभागाला अद्यापही यश मिळालेले नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध अंगणवाड्यांमधून १८२ बालक कुपोषणाच्या विळख्यात सापडली असल्याचे धक्कादायक वास्तव आरोग्य विभागाने केलेल्या एका सर्वेक्षणाद्वारे समोर आले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषण मुक्तीपासून अजूनही कोसो मैल दूर असल्याचे दिसून येत आहे.सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषण मुक्त करणार असे गेली कित्येक वर्षे महिला व बालकल्याण सभापती पदावर बसून गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी या योजनेवर खर्च करण्यात आला. मात्र, त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान अंगणवाडी येथे दाखल झालेल्या बालकांची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली होती.दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषण मुक्त व्हावा यासाठी अजूनपर्यंत जिल्हा परिषदेच्या लाखो रूपयांचा निधी खर्च झाला असला तरी निकाल मात्र म्हणावा तसा मिळालेला नाही. कुपोषण मुक्तीच्या पार्श्वभूमीवर येत्या १५ जानेवारी रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी बालसंगोपन व उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषदकडे या योजनेंतर्गत जिल्हाभरातून ४७ प्रस्ताव प्राप्त असून शस्त्रक्रिया प्रमाणपत्र नसल्याने ते सर्व प्रस्ताव अपूर्ण आहेत. या योजनेची तळागाळापर्यंत माहिती पोहोचत नसल्यामुळे या योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप महिला व बालकल्याण समिती सदस्य श्वेता कोरगांवकर यांनी सभेदरम्यान करत नाराजी व्यक्त केली होती.एकाही लाभार्थीला लाभ नाहीजिल्ह्यात माझी कन्या भाग्यश्री ही शासनाची नाविन्यपूर्ण योजना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने राबविण्यात येत आहे. ही योजना सुरू होऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला तरी एकाही लाभार्थीला या योजनेचा लाभ मिळालेला नाही.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHealthआरोग्य