शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :एसटी संपात सहभाग घेतल्याने १६० कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 14:18 IST

८ व ९ जून रोजी कामावर गैरहजर राहिल्याप्रकरणी सिंधुदुर्ग विभागातील रोजंदारीवरील १६० एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचे आदेश एसटी प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे एसटीच्या सेवेवरही परिणाम झाला असून मंगळवारी दिवसभरातील ८५ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत.

ठळक मुद्देएसटी संपात सहभाग घेतल्याने १६० कर्मचाऱ्यांची सेवासमाप्तीकारवाईमुळे संघटना आक्रमक; आंदोलनाचा इशारा

सिंधुदुर्ग : राज्य परिवहन महामंडळाने केलेल्या पगारवाढीच्या घोषणेनुसार प्रत्यक्षात अपेक्षित वाढ होत नसल्याने नाराज झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे काम बंद आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर ८ व ९ जून रोजी कामावर गैरहजर राहिल्याप्रकरणी सिंधुदुर्ग विभागातील रोजंदारीवरील १६० कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचे आदेश एसटी प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे एसटीच्या सेवेवरही परिणाम झाला असून मंगळवारी दिवसभरातील ८५ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचीही फार मोठी गैरसोय झाली.दरम्यान, प्रशासनाच्या या कारवाईमुळे कामगार संघटना संतप्त झाल्या आहेत. प्रशासनाची ही कारवाई अन्यायकारक असून ती मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या संघटनानी दिला आहे. तसेच या रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयात दावा दाखल करण्यात येईल, असेही या संघटनानी जाहीर केले आहे.एसटी कर्मचाऱ्यांनी ८ जूनपासून राज्यभर काम बंद आंदोलन केले होते. या आंदोलनात सिंधुदुर्गातील एसटी कर्मचारीही सहभागी झाले होते. त्यामध्ये रोजंदारी कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. परिवहन मंत्र्याशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आपले काम बंद आंदोलन मागे घेतले होते. मात्र, प्रशासनाने आता रोजंदारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहेत.मंगळवारी सिंधुदुर्गातील १६० रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या आदेशाची प्रत देण्यात आली. त्यामुळे त्यांना धक्काच बसला. तर या कारवाईमुळे चालक कम वाहकच उपलब्ध नसल्याने एसटीच्या सिंधुदुर्ग विभागातील मंगळवारी दिवसभरातील सुमारे ८५ एसटीच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.अन्यायकारक कारवाईने कामगार संघटना आक्रमक !एसटीतील कोणत्याही कर्मचाऱ्यांस तडकाफडकी सेवामुक्त करु नये, या उद्देशानेच राज्य परिवहन महामंडळामध्ये शिस्त व अपील कार्यपध्दतीचे नियम ठरलेले आहेत. त्यातील तरतुदीनुसारच महामंडळामध्ये कारवाई करण्याचे बंधन आहे, असे असताना संबधित तरतुदीचा भंग करून सुमारे ११०० कामगारांना कोणतीही शहानिशा न करता थेट सेवामुक्तीचे प्रशासनाने आदेश दिले आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्गातील १६० रोजंदारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

ही कारवाई अन्यायकारक आहे. त्यामुळे ही नियमबाह्य कारवाई मागे न घेतल्यास मान्यता प्राप्त संघटनेने बोलाविलेल्या राज्य कार्यकारिणीच्या तातडीच्या बैठकीत निर्णय घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. तसेच न्यायालयातही दावा दाखल करण्यात येईल. असे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता कर्मचारी व एसटी प्रशासन यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटणार आहे. 

टॅग्स :ST Strikeएसटी संपstate transportराज्य परीवहन महामंडळsindhudurgसिंधुदुर्ग