शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सिंधदुर्ग : युवासेनेच्या माध्यमातून पक्ष संघटना बळकट करा : गितेश कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 12:28 IST

सिंधदुर्ग जिल्ह्यात युवासेनेच्या माध्यमातून पक्ष संघटना बांधणीचे काम येत्या कालावधीत करण्यात येणार आहे. या अंतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघात ३ ते १० जानेवारी या कालावधीत सभासद नोंदणी करण्यात येणार आहे. त्याचे योग्य नियोजन करून शिवसेना पक्ष मजबूत करा असे आवाहन युवासेना जिल्हा अधिकारी गितेश कडू यांनी केले.

ठळक मुद्देयुवासेनेच्या माध्यमातून पक्ष संघटना बळकट करा गितेश कडू यांचे आवाहन

कणकवली : सिंधदुर्ग जिल्ह्यात युवासेनेच्या माध्यमातून पक्ष संघटना बांधणीचे काम येत्या कालावधीत करण्यात येणार आहे. या अंतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघात ३ ते १० जानेवारी या कालावधीत सभासद नोंदणी करण्यात येणार आहे. त्याचे योग्य नियोजन करून शिवसेना पक्ष मजबूत करा असे आवाहनयुवासेना जिल्हा अधिकारी गितेश कडू यांनी केले.कणकवली विधानसभा मतदारसंघातील युवासेना पदाधिकाऱ्यांची बैठक येथील विजयभवनमध्ये महिला आघाडीप्रमुख निलम सावंत-पालव यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. यावेळी गीतेश कडू बोलत होते.यावेळी जिल्हा युवासेना चिटणीस स्वप्नील धुरी, जिल्हा समन्वयक राजू राठोड, युवासेना तालुका अधिकारी ललित घाडीगांवकर, युवासेना तालुका अधिकारी अमेय जठार, कणकवली शहर अधिकारी तेजस राणे,वैभववाडी उपतालुकाअधिकारी अतुल सरवटे, वैभववाडी तालुका समन्वयक जयराज हरियान, देवगड युवासेना उपतालुका अधिकारी लवू प्रभू, पोंभुर्ले युवासेना विभाग अधिकारी निलेश नारकर, वैभववाडी तालुका अधिकारी जितेंद्र शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.युवासेनेचे काम अधिक गतिमान करण्यासाठी नूतन पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे. मरगळ झटकून सर्वांनी एकत्रितरित्या संघटनेला उर्जितावस्था येण्याच्या दृष्टीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. येत्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने नविन पदाधिकारी नियुक्तीनंतरची ही पहिलीच बैठक आहे. युवासेनेच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिकाधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.युवासेनेच्या माध्यमातून कणकवली, देवगड व वैभववाडी या तीन तालुक्यांत सभासद नोंदणी मोहिम राबविण्यात येणार आहे. .३ ते १० जानेवारी या कालावधीत ही मोहिम असणार आहे. यावेळी विभाग अधिकारी, शाखा अधिकारी,गट अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्याचे मनोबल वाढविण्याच्यादृष्टीने निलम सावंत-पालव यांच्या हस्ते भगवत् गिता व पुष्पगुच्छ देऊन सन्मानही करण्यात आला.यावेळी नीलम सावंत -पालव म्हणाल्या , तालुक्यांत सक्रिय व तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर यापुढे पक्षाची जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच केवळ पदे मिळवून नव्हे तर निवडणूकीत ताकद दाखविण्याच्यादृष्टीने पदाधिकारी म्हणून जबाबदारी सिद्ध करण्यासाठी सर्वानी तयार रहा. युवा सेनेची ताकद आगामी निवडणूकीत दिसली पाहिजे .यासाठी आतापासूनच प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.गड़किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबविणार !२३ जानेवारी रोजी युवासेनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेची मोहिम राबविण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

कणकवली येथे युवासेना पदाधिकाऱ्यांना भगवत् गिता देवून निलमसावंत-पालव यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी गितेश कडू तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना