शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘सायलेंट स्क्रिम’ प्रथम

By admin | Updated: January 20, 2016 00:47 IST

१७ जिल्ह्यांच्या सहभागाने स्पर्धा रंगली : कुडाळात निर्मिती थिएटर्सचे आयोजन

कुडाळ : कुडाळ येथील निर्मिती थिएटर्सच्यावतीने आयोजित केलेल्या कै. विजय कुडाळकर व कै. उमेश पावसकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मालवणच्या कलांकुर ग्रुपची ‘सायलेंट स्क्रिम’ ने प्रथम, तर रत्नागिरी रसिक रंगभूमी ग्रुपची ‘गिमिक’ ने द्वितीय क्रमांक मिळविला. आचरेकर प्रतिष्ठान कणकवली ग्रुपची ‘ऐन आषाढात पंढरपूरात’ व अक्षरसिंधु कणकवलीच्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ला तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. स्पर्धेत राज्यातील १७ संघांनी सहभाग घेतला.येथील विजय कुडाळकर व उमेश पासकर या हरहुन्नरी कलाकारांनी जगाच्या रंगमंचावरून अचानक एक्झिट घेतली. या नाट्यकलावंतांच्या स्मृती अखंड जपण्यासाठी कुडाळ येथील निर्मिती थिएटर्स कुडाळच्यावतीने मराठा समाजच्या रंगभूमीवर कै. विजय कुडाळकर व कै. उमेश पावसकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मुंबई, पुणे, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच इतर जिल्ह्यातील सुमारे १७ संघांनी कलाविष्कार सादर केला. देवगडच्या श्री समर्थ कलाविष्कार ग्रुपच्या ‘दहा वाजून दहा निमिटे’ एकांकिकेला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.वैयक्तिक बक्षिसात प्रथम तीन क्रमांकाप्रमाणे : पुरूष अभिनय-रघुनाथ कदम (ऐन आषाढात पंढरपूर), आेंकार काणेरकर (दहा वाजून दहा मिनिटे, सचिन टिकम (सायलेंट स्क्रिम), स्त्री अभिनय-शुभदा पवार (सायलेंट स्क्रिम), स्रेहा पराडकर (एका रात्रीची गोष्ट), योगिता चव्हाण (आर्टिफिशल इंटेलिजेन्स) यांना गौरविण्यात आले. तसेच दिग्दर्शन विभागात रघुनाथ कदम (ऐन आषाढात पंढरपूर), तांत्रिक अंग-सायलेंट स्क्रिम (मालवण) यांनी यश मिळविले.बक्षीस वितरण समारंभ ज्येष्ठ दिग्दर्शक चंदू शिरसाट, उद्योजक संतोष सामंत, डॉ. जी. एस. कुलकर्णी, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे प्रणय तेली, उद्योजक शैलेश तिरोडकर, अजित फाटक, माजी ग्रामपंचायत सदस्य राजन नाईक, नंदू कुंटे, पत्रकार अजय सावंत, परीक्षक राजा शिरगुप्पे, संजय नाझरे, संतोष वालावलकर तसेच कै. विजय कुडाळकर यांची श्रेयस व श्रृतिका ही दोन लहान मुले या सर्वांच्या हस्ते पार पडला. यावेळी निर्मिती थिएटर्सचे नागेश नाईक, अंकुश कुंभार, रजनीकांत कदम, समीर ठाकूर, गणेश बावलेकर, सचिन मदने, अजित सावंत, साई गवळी, दीपक राऊळ, विपुल धुरी, प्रविण वेंगुर्लेकर, अमोल बांदेकर, विनोद बांबुळकर, स्नेहा राऊळ, सुरेश राऊळ, बाबुराव कोंडसकर, देवेंद्र परब आदी पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)