सिंधुदुर्ग: जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.सावंतवाडी आणि वेंगुर्ला परिसरात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी सुरुवातीपासूनच भक्कम आघाडी घेतली आहे. तर कुडाळ मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने (शिंदेसेना) आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
वाचा: माडखोलमध्ये अपक्षांचा डंका; भाजप बंडखोरांनी मारली बाजीसंपूर्ण जिल्ह्याचा विचार करता भाजप एकूण ५ जागांवर तर शिंदेसेना २ जागांवर आघाडीवर आहे. कोकणच्या या बालेकिल्ल्यात महायुतीने विरोधकांचे आव्हान मोडीत काढल्याचे चित्र सध्या दिसत आहे. राणे समर्थकांचा प्रभाव आणि महायुतीची रणनीती यामुळे हा विजय निश्चित मानला जात असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काहीतासात निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
Web Summary : In Sindhudurg ZP elections, the ruling coalition surged ahead. BJP leads in 5 seats, Shinde's Sena in 2, showcasing their dominance. The victory, fueled by strategic alliances, is celebrated by supporters.
Web Summary : सिंधुदुर्ग ZP चुनावों में सत्तारूढ़ गठबंधन आगे। भाजपा 5 सीटों पर, शिंदे की सेना 2 पर आगे, उनका दबदबा दिखा। रणनीतिक गठजोड़ से मिली जीत का समर्थकों ने जश्न मनाया।