शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग उपवनसंरक्षकाना कारणे दाखवा नोटीस, मुख्यवनसंरक्षक कार्यालयांची दिशाभूल भोवली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 23:16 IST

कणकवली वनपरिक्षेत्राचे निलंबित कर्मचारी कृष्णा सावंत प्रकरणात विभागीय चौकशी अहवाल प्राप्त होऊनही त्यावर कोणतीही कारवाई न करणे तसेच मुख्यवनसंरक्षक कार्यालयास चुकीची माहिती देऊन घाईगडबडीत चुकीचे आदेश प्रारित करून घेतल्या प्रकरणी कोल्हापूर वनपरिक्षेत्राचे मुख्यवनसंरक्षक अरविंद पाटील यांनी सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सावंतवाडी : कणकवली वनपरिक्षेत्राचे निलंबित कर्मचारी कृष्णा सावंत प्रकरणात विभागीय चौकशी अहवाल प्राप्त होऊनही त्यावर कोणतीही कारवाई न करणे तसेच मुख्यवनसंरक्षक कार्यालयास चुकीची माहिती देऊन घाईगडबडीत चुकीचे आदेश प्रारित करून घेतल्या प्रकरणी कोल्हापूर वनपरिक्षेत्राचे मुख्यवनसंरक्षक अरविंद पाटील यांनी सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यावर सात दिवसात उत्तर द्या अन्यथा वरिष्ठ कार्यालयास आपला अहवाल पाठविण्यात येणार असल्याचेही पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.कणकवली वनपरिक्षेत्राचे वनकर्मचारी कृष्णा सावंत यांना वैभववाडी तालुक्यातील एका मालकी प्रकरणात अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. या कारवाई विरोधात सावंत यांनी मॅट वनविभागाच्या न्याय प्राधिकरणात धाव घेतली. या प्रकरणी विभागीय चौकशीही प्रस्तावित करण्यात आली होती. या चौकशीचा अहवाल २२ मार्च २०१७ ला प्राप्त झाला होता. पण त्यावर कोणतीही कारवाई सिंधुदुर्ग वनविभागाने केली नाही. हा अहवाल तसाच दाबून ठेवण्यात आला होता.याच काळात कृष्णा सावंत हे वनकर्मचारी म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना सेवानिवृत्तीचा कोणताही लाभ मिळत नव्हता. म्हणून या विरोधात त्यांनी मॅटकडे पुन्हा धाव घेतली होती. त्यावर मॅट तत्काळ निर्णय घ्या, असे आदेश कोल्हापूर व सिंधुुदुर्ग वनविभागाला दिले होते. पण याकडे सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दुर्लक्ष केले. तसेच मॅटने अंंितम आदेश देताच यावर चुकीची माहिती न्यायालयाला देण्यात आली होती. यामुळे मुख्यवनसंरक्षक अरविंद पाटील व सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना मॅटने दंड ठोठावला होता.या प्रकरणी मुख्यवनसंरक्षक कार्यालयाने माहिती घेतली असता यात सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण वनकर्मचारी निलंबन प्रकरण हाताळताना अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे लक्षात आल्याने मुख्यवनसरंक्षकांनी तत्काळ  या प्रकरणी चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात संबंधित कर्मचाºयांवर शिक्षा लादण्यासाठी प्रयत्न करणे, मुख्यवनसंरक्षक कार्यालयाची दिशाभूल करणे तसेच आपल्याकडून विभागीय चौकशी अहवालावर कारवाई करण्यास विलंब होणे तसेच कार्यालयाची दिशाभूल करणे आदी बाबतीत सात दिवसांच्या आत  कार्यालयास उत्तर देणे तसेच समाधानकारक उत्तर न मिळाल्यास आपल्याविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करणेबाबत वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.हे पत्र सिंधुदुर्ग वनविभागास चार दिवसांपूर्वीच प्राप्त झाले आहे. मात्र यावर उपवनसंरक्षक यांनी अद्यापपर्यंत उत्तर दिले नाही. पण ते लवकरच उत्तर देतील, असे कोल्हापूर येथील वनकार्यालयाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग