दापोली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवशक्ती विजयी

By Admin | Updated: January 20, 2015 23:41 IST2015-01-20T21:43:41+5:302015-01-20T23:41:25+5:30

कबड्डी स्पर्धेत सहभागी सर्वच संघांनी आकर्षक खेळ सादर केला.

Shivshakti won Dapoli taluka level kabaddi competition | दापोली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवशक्ती विजयी

दापोली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवशक्ती विजयी

आंजर्ले : दापोली शहरानजीक गिम्हवणे येथील श्रीराम क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय खुल्या गटातील कबड्डी स्पर्धेत आसूदच्या शिवशक्ती कबड्डी संघाने अंतिम सामन्यात विजय प्राप्त करत चषकावर आपले नाव कोरले, तर जालगावच्या भैरवनाथ कबड्डी संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. आठ संघांच्या सहभागाने रंगलेल्या या कबड्डी स्पर्धेत सहभागी सर्वच संघांनी आकर्षक खेळ सादर केला. साखळी पध्दतीत यश प्राप्त करून ओमसाई वणंद, भैरवनाथ जालगांव, श्री समर्थ करंजाणी व शिवशक्ती आसूद या चार संघांनी उपांत्य फेरीत स्थान पटकावण्यात यश मिळवले. पहिला उपांत्य फेरीचा सामना, श्री समर्थ करंजाणी विरूध्द भैरवनाथ जालगाव या दोन संघांमध्ये रंगला. दोन्ही संघांमध्ये उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंचा भरणा असल्याने, कबड्डी रसिकांनी अटीतटीच्या लढतीचा थरार अनुभवला. भैरवनाथ जालगावच्या खेळाडूंनी अखेरच्या क्षणी आक्रमक खेळ करत, विजय प्राप्त केला व अंतिम सामन्यात धडक मारली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शिवशक्ती आसूद कबड्डी संघाने दमदार खेळ करत, ओमसाई वणंद कबड्डी संघावर विजय प्राप्त केला असला तरी, वणंद संघाने आसूद संघाला चांगलेच झुंजवले. अंतिम सामन्यात शिवशक्ती वणंद व भैरवनाथ जालगांव संघांनी उत्कृष्ट खेळ करण्याचा प्रयत्न केला. विवेक बांदे्र मालिकावीर, सुनील जगदाळे यांना गौरविण्यात आले. विजेत्या, उपविजेत्या संघासह उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या संघांनाही सन्मानित करण्यात आले. मंडळाच्या सर्व सभासदांनी मेहनत घेतली. (प्रतिनिधी)

Web Title: Shivshakti won Dapoli taluka level kabaddi competition