दारुवाहतुक करणाऱ्या टेम्पोला शिवशाही बसची धडक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 11:45 AM2021-03-02T11:45:31+5:302021-03-02T11:47:20+5:30

Shivshahi Accident sindhudurg- दारु वाहतुक करणाऱ्या आयशर टेम्पोला शिवशाही एसटी बसने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील ओसरगाव टोलनाक्या नजिक मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

Shivshahi bus hits Tempo carrying liquor | दारुवाहतुक करणाऱ्या टेम्पोला शिवशाही बसची धडक 

दारुवाहतुक करणाऱ्या टेम्पोला शिवशाही बसची धडक 

Next
ठळक मुद्देदारुवाहतुक करणाऱ्या टेम्पोला शिवशाही बसची धडक ओसरगाव येथे घटना; वाहनांचे नुकसान ; रस्त्यावर काचेचा खच

कणकवली: दारु वाहतुक करणाऱ्या आयशर टेम्पोला शिवशाही एसटी बसने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील ओसरगाव टोलनाक्या नजिक मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नसून अपघातस्थळी फुटलेल्या दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता.
कणकवली येथून कुडाळच्या दिशेने जात असलेला आणि महाराष्ट्रीयन बनावटीची अधिकृत दारू वाहतूक करणारा आयशर टेम्पो ओसरगाव टोल नाक्यानजिक रस्त्याच्या कडेला उभा होता. पुण्याहून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही एसटी बसने उभ्या आयशर टेम्पोला मागून जोरदार धडक दिली.

या धडकेनंतर टेम्पोतील दारूच्या बाटल्यांचे बॉक्स रस्त्यावर कोसळ फुटलेल्या दारूच्या बाटल्यांचा काचेचा खच रस्त्यावर पडला होता. महामार्ग वाहतूक पोलीस आणि कणकवली पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Web Title: Shivshahi bus hits Tempo carrying liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.