शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

कोकणासाठी शिवसेनेचे योगदान काय? : नारायण राणे यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 12:47 IST

कोकणच्या विकासात शिवसेनेचे योगदान काय? असा सवाल माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देकोकणासाठी शिवसेनेचे योगदान काय? : नारायण राणे यांचा सवालकळसुली येथे स्वाभिमान विश्वास यात्रेत टिका

कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप शासनाला साडेचार वर्षे पुर्ण झाली तरी महागाई कमी होण्याचा पत्ता नाही. जनतेला अच्छे दिन काही आलेले नाहीत. याउलट या सरकारच्या काळात दुप्पट महागाई वाढली आहे.

मोदींचा खोटारडेपणा जनतेसमोर आला आहे. शिवसेनेचे राम मंदिर आंदोलन केवळ फोटोसाठी होते. जिल्ह्याचे पालकमंत्री अपयशी ठरले आहेत. असे सांगतानाच कोकणच्या विकासात शिवसेनेचे योगदान काय? असा सवाल माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला.महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विश्वास यात्रा कळसुली येथील सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जि़ल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, महिलाध्यक्षा प्रणिता पाताडे, संदीप कुडतरकर, जयेंद्र रावराणे, उपाध्यक्ष अशोक सावंत, विकास कुडाळकर, मधुसूदन बांदिवडेकर, नगराध्यक्ष समीर नलावडे, महिला तालुकाध्यक्षा स्वाती राणे, जि़ल्हा परिषद सदस्या सायली सावंत, सभापती सुजाता हळदिवे, विभागीय अध्यक्ष अतुल दळवी, उपसभापती सुचिता दळवी, पंचायत समिती सदस्य मिलींद मेस्त्री आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नारायण राणे पुढे म्हणाले, कणकवलीत आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कचऱ्यावर प्रक्रीया करणारा उद्योग आला आहे. त्यासाठी ९०० कोटींची गुंतवणुक होणार आहे. या प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी, वीज, गॅस, डिझेल, रस्ते कचऱ्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. त्यामुळे कणकवली सारख्या शहरात हा प्रकल्प आणणे हे सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील लोकांचे भाग्य आहे.

गेल्या नऊ दिवसात आमदार नितेश राणे यांनी सभागृहात नाणार प्रकल्प, मराठा आरक्षण या मुद्यावर उठवलेला आवाज पाहून अनेक आमदारांचे मला फोन आले. माझी उणीव भरून काढण्याचे काम खऱ्या अर्थाने नितेश राणे यांनी केले आहे. अशा मुलाबद्दल मला अभिमान वाटतो. लोककल्याणासाठी सातत्याने लढणारा आमदार म्हणून नितेश राणे यांची महाराष्ट्रात ओळख झाल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.२०१४ च्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात आलेल्या सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या घोषणा फसव्या ठरल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या घोषणा दिल्या त्या पुर्ण झाल्या का? याची विचारणा केली असता लोकांमधून नाही असे उत्तर मिळत आहे. याउलट महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष ह्यदेऊ तो शब्द पाळू ह्ण या ब्रीदवाक्याप्रमाणे काम करत आहे. लोकांना विश्वास देण्याच्या दृष्टीने ही विश्वास यात्रा काढली आहे.२६ नोव्हेंबर पासून ही यात्रा संपूर्ण सिंधुदुर्गात फिरत आहे. कणकवलीत इंजिनिअरींग, पडवेत मेडीकल कॉलेज, चिपी विमानतळ, महिलांसाठी सिंधुदुर्ग महिला भवन यासारखे प्रकल्प जनतेच्या हितासाठी राबविले.पालकमंत्री म्हणतात , चार हॉस्पिटल काढणार? पहिल्यांदा शासकीय रूग्णालयांमधील सेवा सुधारा. मगच हॉस्पिटल बांधण्याची भाषा करा. गेल्या साडेचार वर्षात जनतेची दिशाभूल करण्याचे काम जिल्ह्यातील शिवसेनेच्या पालकमंत्री, खासदार, आमदारांनी केल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

सिंधुदुर्गात आर्थिक समृध्दी आणण्याची ताकद असलेला सीवर्ल्ड प्रकल्प बंद पाडला. रेडी प्रकल्प या पालकमंत्र्यानी बंद केला होता. केवळ विरोधासाठी विरोध मी केलेल्या गोष्टीला होत आहे. कळसुली हे माझे आवडते गाव आहे.

या गावातील लोकांनी माझ्यावर खुप प्रेम केले आहे. आत्तापर्यंत या गावाने दिलेला शब्द नेहमी पाळला आहे.तुमच्या प्रेमाची परतफेड निश्चित करेन. नितेश राणे तुमचा आमदार आहे. त्याला पुढील काळात पुन्हा आमदार म्हणून निवडून द्या. तुमच्या गावात, जिल्ह्यात, राज्यात समृध्दी आणण्याचा प्रयत्न आम्ही करू, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला़

या स्वाभिमान यात्रेत दत्ता सामंत, सतीश सावंत, प्रणिता पाताडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विभागीय अध्यक्ष अतुल दळवी व सुत्रसंचालन निलेश पवार यांनी केले.वागदे उपसरपंचांचा पक्ष प्रवेश !या विश्वास यात्रेत वागदे गावचे उपसरपंच संतोष गावडे, माजी उपसरपंच लक्ष्मण घाडीगांवकर व काही मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. त्यामुळे वागदे ग्रामपंचायतमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे़.नितेश , निलेशला साथ द्या !मागील विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला. असे दु:ख कोणाच्या वाट्याला येऊ नये. जिल्ह्याच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत केली. तरी देखील पदरात पराभव आला. असे अपयश कोणाच्या नशिबी नको. काम करणाऱ्या व्यक्तीला मतांच्या रुपात ताकद मिळाली पाहिजे.

नितेश राणे नवनवीन उपक्रम कणकवली विधानसभा मतदार संघात राबवित आहेत. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या समोर उमेदवार उभा न करता एकटेच उमेदवार नितेश राणे निवडणुकीला उभे रहा, असे सांगितले पाहिजे. कारण निलेश आणि नितेश ही माझी दोन्ही मुले कुठल्याही टक्केवारीत नाहीत. आम्ही व्यवसाय करून राजकारण करतो. दोघांनाही तुमच्या स्वाधिन केले आहे. उद्याच्या आमदारकीला आणि खासदारीकीला त्याना साथ देण्याची जबाबदारी तुमची आहे. तुमच्या इच्छा पुर्ण करण्याची जबाबदारी आमची राहील, असे भावनिक आवाहन नारायण राणे यांनी यावेळी केले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्ग