मालवण विषय समित्यांवर शिवसेनेचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 06:17 PM2020-12-30T18:17:48+5:302020-12-30T18:20:37+5:30

Shivsena Malvan Nagerpalika Sindhudurg- मालवण पालिकेच्या विषय समिती सभापतींच्या निवडीत बांधकाम, नियोजन समिती सभापतिपदी मंदार केणी, महिला बालकल्याण समिती सभापतिपदी शीला गिरकर, तर आरोग्य, पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक समिती सभापतिपदी दर्शना कासवकर यांची बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी तथा प्रांत वंदना खरमाळे, कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाडवे यांनी ही निवड जाहीर केली. ​​​​​​​

Shiv Sena's flag on Malvan subject committees | मालवण विषय समित्यांवर शिवसेनेचा झेंडा

मालवण विषय समित्यांवर शिवसेनेचा झेंडा

googlenewsNext
ठळक मुद्देमालवण विषय समित्यांवर शिवसेनेचा झेंडा मंदार केणी, शीला गिरकर, दर्शना कासवकर बिनविरोध

मालवण : मालवण पालिकेच्या विषय समिती सभापतींच्या निवडीत बांधकाम, नियोजन समिती सभापतिपदी मंदार केणी, महिला बालकल्याण समिती सभापतिपदी शीला गिरकर, तर आरोग्य, पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक समिती सभापतिपदी दर्शना कासवकर यांची बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी तथा प्रांत वंदना खरमाळे, कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाडवे यांनी ही निवड जाहीर केली.

पालिकेच्या विषय समिती सभापती निवडीसाठी मंगळवारी पालिकेत प्रांत तथा पीठासीन अधिकारी वंदना खरमाळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, यतीन खोत, मंदार केणी, आकांक्षा शिरपुटे, सेजल परब, तृप्ती मयेकर, शीला गिरकर, दर्शना कासवकर, सुनीता जाधव, पूजा करलकर, ममता वराडकर, पूजा सरकारे, जगदीश गावकर, दीपक पाटकर, उपनगराध्यक्ष राजू वराडकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, सुदेश आचरेकर, पंकज सादये आदी नगरसेवक उपस्थित होते.

गतवर्षीप्रमाणे यावर्षीच्या निवडीतही गटनेतेपदाच्या विषयावरून वाद वाढण्याची चिन्हे निर्माण झाली असताना, जिल्हाधिकाऱ्यांनी उमेदवारांना सर्व सदस्य मतदान करतील, असे निर्देश दिले. यामुळे शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. अशातच शिवसेना-भाजप गटाचे गटनेते गणेश कुशे यांनी ही निवडणूक रद्द करण्यात यावी अशी हरकत नोंदविली. मात्र, पीठासीन अधिकाऱ्यांनी कुशे यांची हरकत फेटाळून लावली.

प्रत्येकी एका सदस्याने उमेदवारी दाखल केल्याने त्यांचे अर्ज वैध ठरवून त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. पाणीपुरवठा समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून उपनगराध्यक्ष राजन वराडकर, तर सदस्य म्हणून यतीन खोत यांची निवड करण्यात आली.


 

Web Title: Shiv Sena's flag on Malvan subject committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.