शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

शिवसेनेकडून दमदाटी करण्याचा प्रयत्न : जशास तसे उत्तर देण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 17:44 IST

zp bjp devgad sindhudurg- जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती निवडणूक लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत हे देवगड तालुक्यातील भाजपाच्या जिल्हा परिषद सदस्यांना रात्री-अपरात्री भेटून दमदाटी करीत आहेत. तसेच आर्थिक आमिषे दाखवित आहेत, असा घणाघाती आरोप भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देशिवसेनेकडून दमदाटी करण्याचा प्रयत्न संतोष किंजवडेकर यांचा आरोप, जशास तसे उत्तर देण्याचा इशारा

देवगड : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती निवडणूक लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत हे देवगड तालुक्यातील भाजपाच्याजिल्हा परिषद सदस्यांना रात्री-अपरात्री भेटून दमदाटी करीत आहेत. तसेच आर्थिक आमिषे दाखवित आहेत, असा घणाघाती आरोप भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी केला आहे.भाजपाच्या प्रामाणिक जिल्हा परिषद सदस्यांना अशाप्रकारे आमिषे दाखवून, दमदाटी करण्याचा प्रकार यापुढे घडल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. देवगड भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संतोष किंजवडेकर बोलत होते. यावेळी माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, तालुका सरचिटणीस शरद ठुकरूल, शैलेश जाधव आदी उपस्थित होते.संतोष किंजवडेकर म्हणाले, एकीकडे प्रसार माध्यमांवर सचिन वाझे प्रकरण सध्या गाजत आहे. त्यामुळे आघाडी सरकारची पुरती नाचक्की झालेली असतानाच दुसरीकडे सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेतेमंडळी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीसाठी भाजपा जिल्हा परिषद सदस्यांना आमिष दाखवून धमकाविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

परंतु, शिवसेनावाल्यांनी समजून जावे की भाजपाचा प्रामाणिक कार्यकर्ता, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी अशा आमिषाला बळी पडणार नाहीत. शिवसेनेच्या या प्रयत्नांना कोणत्याही परिस्थितीत यश येणार नाही. भाजपचे प्रामाणिक पदाधिकारी शिवसेनेचा प्रस्ताव फेटाळून लावतील. अशाप्रकारे भाजपच्या लोकप्रतिनिधींना शिवसेनेकडून धमकाविण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास त्याच ठिकाणी येऊन जशास तसे उत्तर दिले जाईल,असा इशाराही संतोष किंजवडेकर यांनी दिला आहे.सेनेची सत्ता आणण्यासाठीच त्यांचा हा प्रयत्नजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापतींच्या शेवटच्या टर्ममधील निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी शिवसेनेचे बडे नेते विशेष करून सतीश सावंत हे रात्रीची भ्रमंती करीत आहेत. तसेच भाजपाच्या देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे किंजवडेकर म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाzpजिल्हा परिषदShiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग