शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ओसरगाव टोलनाक्यावर शिवसेनेची निदर्शने, टोलमाफी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 14:16 IST

ओसरगाव टोलनाका सूरु करण्याच्या हालचाली परत सुरु झाल्याने शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोलमाफी मिळेपर्यंत ओसरगाव येथील टोलनाका सुरु करण्यास शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. ओसरगाव टोलनाका सूरु करण्याच्या हालचाली परत सुरु झाल्याने शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी आज, शनिवारी पुन्हा ओसरगाव टोलनाक्यावर धडक दिली. तसेच टोलमाफीसाठी जोरदार निदर्शने केली.यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण परियोजना कार्यक्षेत्र कोल्हापूरचे अधिकारी पी. डी. पंदरकर  यांच्याशी आमदार वैभव नाईक व संदेश पारकर यांनी दूरध्वनीवर संवाद साधला. तसेच जोपर्यंत सिंधुदुर्गवासियांना टोलमाफी जाहीर केली जात नाही तसेच महामार्ग संबंधित नागरिकांचे प्रश्न व इतर समस्या मार्गी लागत नाहीत तोपर्यंत टोलनाका सुरु करण्यात येऊ नये. अन्यथा होणाऱ्या परिणामांना आपणास सामोरे जावे लागेल असा इशारा दिला.यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, रामदास विखाळे, राजू राठोड,  युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtollplazaटोलनाकाShiv SenaशिवसेनाKankavliकणकवली