शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रातील भाजपा सरकारच्या प्रस्तावित प्रकल्पाना शिवसेनेचा विरोध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 16:05 IST

Shiv Sena, BJP government's, proposed project, sindhudurg केंद्रातील भाजपा सरकारच्या प्रस्तावित प्रकल्पाना शिवसेना विरोध करत आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प, सी-वर्ल्ड प्रकल्प ,आयुर्वेदीक वनस्पतींवर संशोधन करणारे केंद्र असे प्रकल्प नको असतील तर ठाकरे सरकारला नेमके काय हवे आहे ? ते तरी त्यांनी स्पष्ट करावे.

ठळक मुद्देकेंद्रातील भाजपा सरकारच्या प्रस्तावित प्रकल्पाना शिवसेनेचा विरोध !प्रमोद जठार यांची टीका

कणकवली : केंद्रातील भाजपा सरकारच्या प्रस्तावित प्रकल्पाना शिवसेना विरोध करत आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प, सी-वर्ल्ड प्रकल्प ,आयुर्वेदीक वनस्पतींवर संशोधन करणारे केंद्र असे प्रकल्प नको असतील तर ठाकरे सरकारला नेमके काय हवे आहे ? ते तरी त्यांनी स्पष्ट करावे. लोकोपयोगी प्रकल्प नाकारणाऱ्या राज्यातील ठाकरे सरकारचा आम्ही धिक्कार करतो. असे भाजपा प्रदेश सचिव ,माजी आमदार प्रमोद जठार यांनी म्हटले आहे.त्यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोकणाचा विकास कसा करायचा? हे शिवसेनेने आता जाहीर केले पाहिजे. शिवसेनेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे कोकणात प्रकल्पांना कोणी जागा देता का ? असे म्हणण्याची वेळ केंद्र सरकारवर आली आहे.

आता आणखी काय केले तर केंद्राच्या या पर्यावरण पुरक आयुर्वेदीक वनस्पतीवर संशोधन करणाऱ्या प्रकल्पाला शिवसेना सरकार सिंधुदुर्गात दोडामार्ग - आडाळी येथे जागा देईल ? हेच समजत नाही. ठाकरे सरकारचे कोकणावरचे प्रेम हेच आहे का ? असा प्रश्न आम्हाला पडतो.केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सिंधुदुर्गात आयुर्वेदीक वनस्पतींवर संशोधन करणारा प्रकल्प व्हावा म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली आहे. मात्र, कोकणातील आमदारांच्या जिवावर उभे असलेल्या ठाकरे सरकारचे मंत्री प्रकल्प लातुरला पळवत आहेत, त्याचा आम्ही धिक्कार करत आहोत.शिवसेनेच्या खासदारांना सिंधुदुर्गातील तसेच कोकणातील जनतेला न्याय द्यावाच लागेल. अन्यथा पुढील काळात कोकणातून शिवसेनेला जनताच हद्दपार करेल,असा इशाराही प्रमोद जठार यांनी या दिला आहे. 

टॅग्स :Pramod Jatharप्रमोद जठारsindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाShiv Senaशिवसेना