शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची मते चालतात मग शिवबंधन का नको, विनायक राऊतांचा संभाजीराजेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 17:51 IST

मुख्यमंत्री तुमचा आदर राखतात म्हणूनच त्यांनी तुम्हाला शिवबंधन बांधण्यास सांगितले होते.

सावंतवाडी : संभाजीराजे यांनी सहाव्या जागेसाठी अपक्ष निवडणूक लढण्याचा घेतलेला निर्णय अखेर मागे घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांवर शब्द मोडल्याचा आरोप केला. त्यावर शिवसेनेने पलटवार केला असून, शिवसेनेची मते चालतात मग शिवबंधन का नको असा सवाल शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार दिपक केसरकर उपस्थित होते.राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी पुरस्कृत लढण्यावर संभाजीराजे ठाम होते. मात्र ही जागा शिवसेनेकडे असल्याने त्यांनी संभाजीराजेंना ही निवडणूक शिवसेनेकडून लढण्याची ऑफर दिली होती. महाविकास आघाडीकडे पुरेशी मते असल्याने संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चाही केली होती. मात्र, संभाजीराजे यांना शिवसेना प्रवेशाची अट घालण्यात आली होती. पण ही अट त्यांनी अमान्य केल्यानंतर शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली.तुम्ही राजे आहात असे बोलणे योग्य नाहीयानंतर संभाजीराजेंनी आज, मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपणास दिलेला  शब्द पाळला नसल्याचा आरोप करत ही माघार नाही, माझा स्वाभिमान जपला असे सांगत राज्यसभा लढवणार नसल्याची घोषणा केली. त्याला खासदार राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. संभाजीराजे ना शिवसेनेची मते चालतात मग शिवबंधन का नको असा सवाल करत तुम्ही राजे आहात असे बोलणे योग्य नाही...तर आम्हाला आनंद झाला असतामुख्यमंत्री तुमचा आदर राखतात म्हणूनच त्यांनी तुम्हाला शिवबंधन बांधण्यास सांगितले होते. मग शब्द फिरवला असे कसे म्हणता असा सवाल राऊत यांनी केला आहे. राजे जर शिवसेना पक्षाचे खासदार म्हणून राज्यसभेत गेले असते तर आम्हाला अधिक आनंद झाला असता असेही राऊत म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकShiv Senaशिवसेना