शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मच्छिमारांमधील संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्नशील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 16:38 IST

कोकणातील शिवसेना आमदारांचा पर्ससीन व प्रकाशझोतातील मासेमारीला ठाम विरोध आहे.

मालवण : कोकणातील शिवसेना आमदारांचा पर्ससीन व प्रकाशझोतातील मासेमारीला ठाम विरोध आहे. त्यामुळेच सरकारने प्रकाशझोतातील मासेमारीवर बंदीचा निर्णय घेतला. पर्ससीन व एलईडी मासेमारी पूर्णपणे बंद करण्यासाठी शिवसेना सक्षम आहे. अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी व मच्छिमारांमधील संघर्ष टाळण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. 

मालवण दौऱ्यावर असलेल्या आमदार नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधत पर्ससीनबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. शासनाकडून पर्ससीन मासेमारीवर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी शिवसेना कायमच आग्रही राहिली आहे. मत्स्य हंगाम कालावधीत पर्ससीन-एलईडी मासेमारीवर पूर्णत: बंदी आणण्याचे शासनाचे धोरण असून त्याअनुषंगाने मत्स्य व्यवसाय मंत्र्यांशी मुंबईत चर्चा झाली आहे. यात गस्तीनौकेची निविदा तीन वर्षांसाठी घेण्याचे मान्य केले आहे, असे वैभव नाईक यांनी सांगितले.

मत्स्य विभागाचे अधिकार वाढविणार

अनधिकृत मासेमारी नौकांवर मत्स्य विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबतचे सर्व अधिकार तहसीलदारांकडे असतात. मात्र, कारवाई केलेल्या नौकांवर दंडाचे अधिकार मत्स्य विभागाला देण्याबाबत मासेमारी अधिनियम कायद्यात बदल करण्याची मागणी आपण केली असून शासनाने त्यास अनुकूलता दर्शविली आहे. यावर हिवाळी अधिवेशनात निर्णय होईल, असे आमदार नाईक यांनी सांगितले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना