विविध प्रश्नांबाबत शिवसेनेने वेधले लक्ष

By Admin | Updated: November 7, 2014 23:42 IST2014-11-07T21:50:01+5:302014-11-07T23:42:34+5:30

विनायक राऊत, वैभव नाईक यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Shiv Sena focuses on various issues | विविध प्रश्नांबाबत शिवसेनेने वेधले लक्ष

विविध प्रश्नांबाबत शिवसेनेने वेधले लक्ष

सिंधुदुर्गनगरी : शिवसेना खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्यातील जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्यादृष्टीने पावले उचलली असून त्यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांची भेट घेतली.सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत हे जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघातील विविध रखडलेली विकासकामे आणि जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनीही आपल्या मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनीही आपल्या मतदारसंघातील समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न, रूग्णालयांची झालेली बिकट अवस्था, शेती, बागायतीच्या नुकसानीची समस्या, रस्त्यांचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न आणि शिक्षण क्षेत्रातील समस्या याबाबत जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. निवडणुकीत दिलेली आश्वासने आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्याचे कर्तव्य बजावण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये याचे कौतुक होत आहे. निवडणुकीनंतर काही कालावधीतच सर्वसामान्य जनतेशी संपर्क साधून समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेना खासदार आणि आमदार यांनी आखलेली धडक मोहीम सर्वांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. तर सर्वसामान्य नागरिकांना कधीही भेट होईल आणि त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेणारे आमदार आणि खासदार म्हणून त्यांनी आपली जिल्ह्यात ओळख निर्माण केली आहे.
शुक्रवारी त्यांनी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांची भेट घेत जिल्ह्यातील दौऱ्यात आढळलेल्या समस्या सोडविण्याबाबत चर्चा केली. त्याच्यासोबत जिल्ह्यातील शेकडो शिवसैनिक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. केवळ आश्वासने देऊन गप्प बसणार नाही तर प्रत्यक्ष कृतीतून जिल्ह्यातील रखडलेली कामे पूर्ण करून जिल्हावासियांचे मन जिंकण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे.(वार्ताहर)

Web Title: Shiv Sena focuses on various issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.