भास्कर जाधवांचा भाऊ समर्थकांसह शिवसेनेत
By Admin | Updated: December 3, 2015 23:51 IST2015-12-03T23:02:18+5:302015-12-03T23:51:02+5:30
पक्षनेते उद्धव ठाकरे यांनी जाधव यांच्या हातात भगवा झेंडा देऊन त्यांचे स्वागत केले.

भास्कर जाधवांचा भाऊ समर्थकांसह शिवसेनेत
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील कळंबट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य बाळकृष्ण जाधव यांनी आज (गुरुवारी) त्यांच्या समर्थकासह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पक्षनेते उद्धव ठाकरे यांनी जाधव यांच्या हातात भगवा झेंडा देऊन त्यांचे स्वागत केले. हा प्रवेश शिवसेना भवन येथे झाला. स्थानिक राजकारणाला कंटाळून अखेर बाळकृष्ण जाधव यांनी आपले भाऊ तुरंबवचे सरपंच रामकृष्ण जाधव, ढाकमोलीचे माजी सरपंच दादा लाड, निर्व्हाळचे उपसरपंच शैलेश जाधव, श्रीराम घाग, सुभाष पंडित, जयसिंग सुर्वे, सीताराम गावडे, भाई सकपाळ यांच्यासह कळंबट जिल्हा परिषद गटातील अनेक कार्यकर्ते व मुंबईकर यांनी प्रवेश केला. यावेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम, जिल्हा संपर्कनेते विजय कदम, जिल्हाप्रमुख सचिन कदम, खेड पंचायत समिती सभापती अण्णा कदम, माजी आमदार सूर्यकांत दळवी, माजी सभापती किशोर देसाई व गुहागरचे सहसंपर्कप्रमुख श्याम साळुंखे उपस्थित होते.(प्रतिनिधी)