शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीत पेटली ठिणगी! नगरसेवकांच्या निलंबनावरून निलेश राणेंनी भाजपा जिल्हाध्यक्षाला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 16:32 IST

सिंधुदुर्ग : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कोकणात महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेना ...

सिंधुदुर्ग: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कोकणात महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेना शिंदेगटात फोडाफोडीवरून तणाव निर्माण झाला आहे. कुडाळ नगरपंचायतीमधील नगराध्यक्षांसह सहा नगरसेवकांवर शिस्तभंगाचा ठपका ठेवत भाजपामधून निलंबित करण्यात आले. यावरुन शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे यांनी संतप्त होत भाजप जिल्हाध्यक्षांना खडेबोल सुनावले आहेत.

निलेश राणे यांनी याबाबत आपल्या एक्स हॅडेलवरुन ट्विट केले आहे. सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी माझ्या मतदारसंघात म्हणजे कुडाळ नगरपंचायत मधल्या सहा नगरसेवकांचे निलंबन केले आहे. आम्हाला ज्या दिवशी खासदार नारायण राणे सांगतील त्या दिवशी हे निलंबन मान्य करू. सिंधुदुर्गात भाजपचे निर्णय हे खासदार राणे साहेब घेत असतात म्हणून या पत्राला आम्ही किंमत देत नाही असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कुडाळ नगरपंचायतीमध्ये भाजपाचे आठ नगरसेवक असून, या आठ नगरसेवकांपैकी सहा नगरसेवकांना शिस्तभंगाचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी संबंधित नगरसेवकांना नोटिसा बजावल्या आहेत.

निलंबित का केलं?नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, संध्या तेरसे, रामचंद्र परब हे पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नाहीत, त्यांना वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा ते सहकार्य करत नाहीत. भाजपच्या अधिकृत बैठका, सभा आणि कार्यक्रमांना वारंवार अनुपस्थित राहणे, इतर राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर हजर राहणे, पक्षाच्या अधिकृत सदस्यता नोंदणी मोहिमेत सहभागी न होणे आणि सक्रिय सदस्यत्व न घेणे, इतर पक्षाच्या सभासद नोंदणी कार्यक्रमांना हजेरी लावणे, पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात सार्वजनिक विधाने करणे, वरील सर्व बाबी संदर्भात पक्षशिस्त पाळलेली नाही. त्यामुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष या नात्याने, पक्षघटनेतील अधिकारांचा वापर करून पक्षातील सर्व पदांवरून व प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित केले असल्याचं प्रभाकर सावंत यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.