She left her husband for love, her boy also moved away | प्रेमासाठी तिने सोडले नवऱ्याला, मुलालाही लोटले दूर
प्रेमासाठी तिने सोडले नवऱ्याला, मुलालाही लोटले दूर

ठळक मुद्दे प्रेमासाठी तिने सोडले नवऱ्याला, मुलालाही लोटले दूर कणकवली पोलीस ठाण्यात धाव

कणकवली : पाच वर्षांपूर्वी एका इंजिनियरशी एका युवतीने नातेवाईकांच्या दबावापोटी विवाह केला होता. तत्पूर्वी सिंधुदुर्गातील एका मुंबईस्थित क्रिकेटपटूशी तिचे प्रेम संबंध जुळले होते. विवाह झाला तरी त्या विवाहितेचे संसारात मन रमले नाही. त्यामुळे अखेर तिने प्रियकराच्या भेटीसाठी कणकवली गाठली.

कणकवलीत आल्यानंतर प्रियकराचा फोन नॉट रिचेबल येत असल्याने त्या विवाहितेने थेट कणकवली पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी प्रियकराबरोबरच तिच्या पतीशीही संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांसमोरच घडलेल्या चर्चेत तिने चक्क प्रेमासाठी नवऱ्यासह मुलालाही नाकारले.

कणकवली पोलीस ठाण्यात त्या महिलेने पोलीस निरीक्षकांसमोरच मला त्या नवऱ्यांबरोबर रहायचेच नाही. मुलगाही त्याच्याकडेच राहू दे. मला माझ्या प्रियकरासोबत जायचे आहे, असे उघडपणे सांगत आपल्या पाच वर्षांच्या संसाराला तिलांजली दिली.

त्या महिलेचा पती औरंगाबादमध्ये चांगला व्यवसाय करीत आहे. ती महिलाही उच्चशिक्षीत आहे. तरीदेखील त्या महिलेने प्रेमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एका क्रिकेटपटूशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या पाच वर्षांपूर्वीपासून सुरू असलेल्या प्रेमाचा मार्ग त्या युवकाच्या घरापर्यंत पोहोचला आहे. या घडलेल्या घटनेची चर्चा कणकवलीत जोरदार रंगली होती.


Web Title:  She left her husband for love, her boy also moved away
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.