शरद पवारांचे बांद्यात जल्लोषी स्वागत

By Admin | Updated: March 30, 2015 00:23 IST2015-03-29T22:23:49+5:302015-03-30T00:23:41+5:30

पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा : कट्टा कॉर्नरवर ‘आगे बढो’च्या घोषणा

Sharad Pawar's lavish reception | शरद पवारांचे बांद्यात जल्लोषी स्वागत

शरद पवारांचे बांद्यात जल्लोषी स्वागत

बांदा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांचे बांदा कट्टा कॉर्नर येथे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. काँग्रेस नेते नारायण राणे यांना वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीने जाहीर पाठिंबा व्यक्त केल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात आलेल्या पवार यांचे बांदा येथे दोन्ही काँग्रेसकडून स्वागत करण्यात आले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, प्रदेश उपाध्यक्ष आबिद नाईक, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सुरेश दळवी, काँग्रेसचे सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष गुरुनाथ सावंत यांनी कट्टा कॉर्नर चौकात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शरद पवार ‘आगे बढो’च्या घोषणा देण्यात आल्यात.
यावेळी डेगवे उपसरपंच मधु देसाई, प्रविण देसाई, मंगलदास देसाई, माजी सभापती भगवान देसाई यांच्यासह दोन्ही काँग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
होते. (प्रतिनिधी)

Web Title: Sharad Pawar's lavish reception