व्यक्तीपेक्षा पक्षसंघटना महत्त्वाची शरद पवारांनी बंडखोर आमदार केसरकरांना फटकारले

By Admin | Updated: May 15, 2014 00:30 IST2014-05-15T00:27:45+5:302014-05-15T00:30:01+5:30

सिंधुदुर्गनगरी : पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही. व्यक्तीपेक्षा पक्षसंघटना महत्त्वाची आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांच्या नेतृत्वाखाली काम करा.

Sharad Pawar reprimanded the rebel MLA Kesarkar | व्यक्तीपेक्षा पक्षसंघटना महत्त्वाची शरद पवारांनी बंडखोर आमदार केसरकरांना फटकारले

व्यक्तीपेक्षा पक्षसंघटना महत्त्वाची शरद पवारांनी बंडखोर आमदार केसरकरांना फटकारले

 सिंधुदुर्गनगरी : पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही. व्यक्तीपेक्षा पक्षसंघटना महत्त्वाची आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांच्या नेतृत्वाखाली काम करा. वैयक्तिक स्वार्थासाठी जर कोण कार्यकर्त्यांना वेठीस धरत असेल तर सिंधुदुर्गातील कार्यकर्ते त्याची कदापी साथ करणार नाहीत. संघटना उभी करण्यासाठी कष्ट लागतील. त्यासाठी तुम्ही पक्षनिष्ठा ठेवा पक्ष तुमचा सतत सन्मानच करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सिंधुदुर्गनगरी येथे बोलताना व्यक्त केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. त्यामुळे केसरकर आता कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस कै. अ‍ॅड. गुरूनाथ कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गनगरी येथे साकारलेल्या शरद कृषी भवनाचे उद्घाटन शरद पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पाटबंधारे मंत्री सुनील तटकरे, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष जीतेंद्र आव्हाड, महिला अध्यक्षा आमदार विद्या चव्हाण, आमदार किरण पावसकर, निरंजन डावखरे, स्वप्नगंधा कुलकर्णी, शरद कृषी भवनचे विश्वस्त विक्रमसिंह पाटणकर, संयोजक अविनाश चमणकर, जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, युवक अध्यक्ष अबीद नाईक, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, नंदूशेठ घाटे, पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, माजी आमदार शिवराम दळवी, प्रमोद हिंदूराव, सुभाष मयेकर, सरचिटणीस बाप्पा सावंत आदी उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी अ‍ॅड. गुरूनाथ कुलकर्णी आणि सहकार महर्षी कै. शिवराम भाऊ जाधव यांच्या कार्याचा गौरव केला. शरद पवार म्हणाले, सिंधुदुर्गात सहकाराची मुहूर्तमेढ शिवराम भाऊ जाधव यांनी रोवली. तर सार्वजनिक जिवनात कसे वागावे, राजकीय आर्थिक शिस्त कशी असावी हे अ‍ॅड. कुलकर्णींनी शिकविले. शरद कृषी भवनच्या माध्यमातून आंबा, फळबागायतदार, शेतकरी यांना मार्गदर्शन केले जाईल. शेतीसंबंधी विविध विषयावर मार्गदर्शन होण्यासंबंधी संधी येथे उपलब्ध करून दिल्या जातील. गुंडगिरीने पक्ष वाढवणार नाही सिंधुदुर्गात राष्ट्रवादी पक्ष आपल्याला वाढवायचा आहे. मात्र, गुंडगिरीने नको. काही जण दामदपटशाहीने आपणच मोठे असल्याच्या अविर्भावात कार्य करतात. मात्र, आपल्याला तसे करायचे नाही. कायदा हातात घेवू नका. आपण लोकांच्या समस्या जाणून घेवून त्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठा जपावी. एखादा पदाधिकारी जर वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षाला वेठीस धरत असेल तर त्याची पक्ष तमा बाळगणार नाही. असा सज्जड दम भरताना चांगले कार्य करणार्‍यांचा गौरव केला जाईल, असे सांगितले. स्वागत स्वीकारले मात्र, कार्यक्रमस्थळी एंट्री नाकारली राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन होताच सकाळी पत्रादेवी नाक्यावर त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर व केसरकर समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर आमदार केसरकर हे शरद कृषी भवनाच्या उद्घाटन समारंभाच्या ठिकाणी कार्यक्रमासाठी आले होते. मात्र, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केसरकर यांना फटकारले. तुमचे कार्यक्रमपत्रिकेत नाव नाही. मग तुम्ही कशाला आलात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर केसरकर आणि त्यांच्या समर्थकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणाकडून काढता पाय घेतला.

Web Title: Sharad Pawar reprimanded the rebel MLA Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.