शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या गुगलीमुळेच उद्धव ठाकरे कायमचे घरी बसले, नितेश राणेंनी लगावला टोला 

By सुधीर राणे | Updated: June 30, 2023 13:37 IST

शरद पवार समजायला आम्हाला जर शंभर जन्म घ्यावे लागणार असतील, तर ठाकरेंना २०० जन्म घ्यावे लागतील.

कणकवली : शरद पवार समजायला आम्हाला जर शंभर जन्म घ्यावे लागणार असतील, तर ठाकरेंना २०० जन्म घ्यावे लागतील. पवार यांच्या गुगलीमुळे पहाटेच्या शपथविधीत जशी अजित दादांची विकेट पडली, तशी ठाकरेंना कायमचे घरी बसवून त्यांचीही विकेट पाडली आहे असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आज, शुक्रवारी राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, बाळासाहेबांची हिंदुत्ववादी विचारसरणी उद्धव ठाकरे यांनी सोडली. त्यामुळे त्यांना बाजूला करून ५० योध्दे सोबत घेवून शिंदे - फडणवीस यांनी राज्यात सत्ता आणली. हिंदुत्ववादी सरकार आणले आणि ठाकरे यांना कायम स्वरुपी घरी बसविले. आज त्या स्वाभिमानाची वर्ष पूर्ती आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे हिंदुत्व आणि सरकारची वर्ष पूर्ती आहे.फक्त नातेवाईकच शिल्लक आदित्य ठाकरे यांचे जवळचे आणि कट्टर असलेले राहुल कणाल हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा आदित्य ठाकरे यांना  फार मोठा राजकीय धक्का आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे संजय राऊत हे शकुनी मामा आहेत. तसा वरूण सरदेसाई हा आदित्य ठाकरेंकडे शकुनी मामा आहे. त्याच्यामुळेच आदित्य ठाकरेंच्या आजू बाजूला फक्त नातेवाईक शिल्लक राहिले आहेत. त्यांना कार्यकर्ते, पदाधिकारी सोडून चालले आहेत.वरूण सरदेसाई भाजप किंवा शिंदे सेनेसोबत जाण्यास इच्छूक कोविड सेंटर भ्रष्ट कारभारात वरूण सरदेसाई यांचा मोठा वाटा असून सूरज चव्हाण यांच्या जबाबात त्याचा सर्वत्र उल्लेख आला आहे. आता सरदेसाई भाजप किंवा शिंदे सेनेसोबत जाण्यास इच्छूक आहेत. ते कुठे कुठे भेटून पक्षात घेण्याची विनंती करत असतात हे आम्ही लवकरच सांगू. राऊतांनी फक्त पत्रकारिता करावीशरद पवारांच्या भाषेत सांगायचे झाले तर ठाकरेंना कायमचे निवृत्त करण्याचे काम राऊत, सरदेसाई करत आहेत असेही आमदार राणे यावेळी म्हणाले. खासदार संजय राऊत हे दिल्लीत हाऊस किपिंगचे काम करत आहेत का? त्यांना मंत्रीमंडळ विस्ताराबद्दल काय माहीत आहे. त्यांनी फक्त पत्रकारिता करावी. असेही राणे म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार