शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मालवणात परतीच्या पावसाचा धुमाकुळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 11:59 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे परतीच्या पावसाने विजांच्या जोरदार कडकडाटात गुरुवारी सायंकाळी पुन्हा हजेरी लावली. यावेळी सायंकाळी मालवण दांडी भागात कोसळलेल्या विजेमुळे दांडेश्वर मंदिराच्या मागे राहणाºया नारायण मोंडकर यांच्या जागेतील दोन माड जळाले आहेत.

ठळक मुद्देवीज कोसळून माड, झोपडी जळालीनागरिकांसह पर्यटकांची तारांबळ

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे परतीच्या पावसाने विजांच्या जोरदार कडकडाटात गुरुवारी सायंकाळी पुन्हा हजेरी लावली. यावेळी सायंकाळी मालवण दांडी भागात कोसळलेल्या विजेमुळे दांडेश्वर मंदिराच्या मागे राहणाऱ्या  नारायण मोंडकर यांच्या जागेतील दोन माड जळाले आहेत.

या आगीची ठिणगी मोंडकर यांच्या झावळाच्या झोपडीवर पडल्याने झोपडीला आग लागून अंशत: नुकसान झाले. यावेळी ग्रामस्थांनी पाण्याचा मारा करत तसेच पालिकेच्या अग्निशमन बंबाच्या साहाय्याने ही आग विझविण्यात आली.दिवाळीपूर्वी मालवणला झोडपून काढणाऱ्या पावसाने दिवाळी कालावधीत विश्रांती घेतली होती. मात्र गुरुवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन ढगांचा गडगडाट सुरु झाला. यानंतर पावसाने हजेरी लावली.

यावेळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या विजांच्या जोरदार कडकडाटात दांडी भागातील दांडेश्वर मंदीराच्या मागे विजेचा लोळ कोसळला. यामध्ये नारायण मोंडकर यांच्या जागेतील दोन माड जळून नुकसान झाले.माडांना लागलेल्या आगीची ठिणगी मोंडकर यांच्या झोपडीवर पडल्याने झोपडीला आग लागली. मात्र ग्रामस्थांनी तातडीने पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. यावेळी दाखल झालेल्या पालिकेच्या अग्निशमन बंबाने पाण्याचा मारा करत आग पूर्णत: विझविण्यात आली. त्यामुळे झोपडीचे नुकसान झाले.

सायंकाळनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री मालवणात जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसांमुळे नागरिकांसह पर्यटकांची तारांबळ उडाली. बत्तीही गुल झाली होती.

 

टॅग्स :konkanकोकणRainपाऊस