छाया तळणकरची ‘फ्रुट कस्टर्ड’ रेसिपी प्रथम
By Admin | Updated: January 17, 2015 00:09 IST2015-01-16T22:26:49+5:302015-01-17T00:09:23+5:30
दोडामार्गमध्ये आयोजन : हळबे कॉलेजच्या खाद्यमहोत्सवाला प्रतिसाद

छाया तळणकरची ‘फ्रुट कस्टर्ड’ रेसिपी प्रथम
कसई दोडामार्ग : येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या खाद्य महोत्सव स्पर्धेत छाया बाबली तळणकर हिने सादर केलेल्या ‘फ्रुट कस्टर्ड’ या रेसिपीला प्रथम क्रमांक मिळाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्माण शिक्षण संस्थेचे सदस्य सूर्यकांत परमेकर, स्थानिक नियामक समिती अध्यक्ष विवेकानंद नाईक आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या स्पर्धेत इशा गणपत बर्वे (गाजर हलवा) हिने द्वितीय, तर निकिती विश्वनाथ नाईक (खरवस) हिने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच शिवानी गवस (धोंढस), श्वेता धर्णे (व्हेज पुलाव), रुची नेवरेकर (आंबोळी) यांना उत्तेजनार्थ बक्षिसाने गौरविण्यात आले. स्पर्धेत विद्यार्थिनींबरोबरच विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून स्मिंता फातर्पेकर, मेघा जोशी यांनी काम पाहिले. सर्व विजेत्यांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. डॉ. आर. एस. इंगळे, प्रा. एस. एस. पाडगावकर, किरण नाईक, प्रा. एस. एन. खडपकर, इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)