शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात महसुली अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 15:46 IST

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने आज महसूल विभागाच्या ७ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. यात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांचा समावेश आहे. बदल्यांच्या माध्यमातून रिक्त होणाºया जागांवर शासनाने अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

ठळक मुद्दे निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात महसुली अधिकाऱ्यांच्या बदल्याबदलीत निवासी उपजिल्हाधिकारी पदासह, पुरवठा अधिकारी व तहसीलदारांचा समावेश

सिंधुदुर्गनगरी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने आज महसूल विभागाच्या ७ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. यात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांचा समावेश आहे. बदल्यांच्या माध्यमातून रिक्त होणाºया जागांवर शासनाने अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात महसूल अधिका-यांच्या बदल्यांचे सत्र सध्या जोरदार सुरू आहे.गुरूवारी २१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७ महसुली अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत.निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांची वनजमाव बंदी अधिकारी सिंधुदुर्ग या पदावर बदली झाली आहे. हे कार्यालय कोकण भवन येथे आहे. त्यांच्या जागी वनजमाव बंदी अधिकारी या पदावर कार्यरत असणाऱ्या शुभांगी साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन राऊत यांची दापोली उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

कणकवली उपविभागीय अधिकारी निता शिंदे यांची उपजिल्हाधिकारी भुसंपादन क्रमांक - २६ पुणे येथे बदली झाली असून त्यांच्या जागी रायगड उपजिल्हाधिकारी या पदावर कार्यरत असलेले चंद्रकांत मोहीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कुडाळ तहसीलदार अजय घोळवे यांची अतिक्रमण निष्काशीत अधिकारी अंधेरी या पदावर बदली झाली आहे तर त्यांच्या जागी रत्नागिरी तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैभववाडी तहसीलदार संतोष जाधव यांची रत्नागिरी येथे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर बदली झाली आहे तर त्यांच्या जागी म्हसळा तहसीलदार रामदास झळके यांची बदली करण्यात आली आहे. मालवण तहसीलदार समीर घारे यांची दापोली तहसीलदार पदावर तर पेण तहसीलदार पदावर अजय पाटणे यांची त्या जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे.वेंगुर्ला तहसीलदार शरद गोसावी यांची रायगड जिल्ह्यातील म्हसळा तहसीलदार पदावर बदली झाली असून त्यांच्या जागी उपनगर येथील तहसीलदार निवडणूक अधिकारी प्रवीण लोकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील रजा आणि राखीव तहसीलदार राजेंद्र बिर्जे यांची येथील तहसीलदार पुनर्वसन या पदावर बदली करण्यात आली आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग