कणकवलीजवळील अपघातात सात प्रवासी जखमी
By Admin | Updated: May 10, 2017 16:28 IST2017-05-10T16:28:13+5:302017-05-10T16:28:13+5:30
कारची टायर फुटली, वाहतूकीची काही काळ कोंडी

कणकवलीजवळील अपघातात सात प्रवासी जखमी
आॅनलाईन लोकमत
कणकवली (जि. सिंधुदुर्ग) , दि. १0 : मुंबई-गोवा महामार्गावर सावडाव फाट्याजवळ झालेल्या अपघातात सात प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवारी दुपारी झाला.
मुंबई-गोवा महामार्गावर सावडाव फाट्याजवळ कणकवलीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव व्हेंटो कारचा टायर फुटला. यामुळे या कारची धडक समोरुन येणाऱ्या तवेरा गाडीला बसली. यामुळे ती गाडी थेट गटारात पडली. या अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूकीची कोंडी झाली.
जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस शाम भगत आणि सहकाऱ्यांनी ही वाहतूक तत्काळ सुरळीत केली. यामध्ये जखमी झालेल्या सात प्रवाशांना तत्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक माहिती पोलिस घेत आहेत.