शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडीत पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात सात जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 17:16 IST

वैभववाडी: पिसाळलेल्या कुत्र्यानं सकाळी वैभववाडी शहरासह एडगाव आणि सोनाळीत अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

वैभववाडी: पिसाळलेल्या कुत्र्यानं सकाळी वैभववाडी शहरासह एडगाव आणि सोनाळीत अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या श्वानाने दोन बालकांसह तब्बल सात जणांवर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले आहे. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिसाळलेल्या श्वानाच्या दहशतीमुळे वैभववाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.सोनाळी येथील क्रिश मंगेश शिंदे(वय ५ वर्षं) या बालकाचा रविवारी सायंकाळी कुत्र्यानं चावा घेतला. त्यानंतर सोमवारी सकाळी वैभववाडी शहरासह एडगाव इनामदारवाडी हल्ला चढवून धुमाकूळ घालत दहशत माजवली. शहरातील गोपाळनगर येथील श्रावणी उदय गजोबार(वय 7 वर्षे) या चिमुकलीला लक्ष बनविले. घराबाहेर खेळत असलेल्या श्रावणीच्या कानाचा श्वानाने लचका तोडला. तसेच सुशीला दादू गजोबार(वय७०) व संजय  निकम (वय३३) यांना गंभीर जखमी केले.तेथून त्याने पोलीस वसाहतीतील विजया शिरवलकर(वय 48) यांना लक्ष करीत हल्ला केला. त्यांना जमिनीवर पाडून चेह-यावर चावा घेत ओरबाडून गंभीररीत्या जखमी केले. त्यामध्ये सुदैवानेच त्यांचे डोळे  बचावले आहेत. तसेच दीपक चंदू सूर्यवंशी(वय ३७) यांच्यावर हल्ला केला. तेथून श्वानाने एडगाव इनामदारवाडीकडे मोर्चा वळवला. तेथील कृष्णाजी देसाई(वय ६१) यांना चावा घेऊन जखमी केले. या जखमींवर ग्रामीण रुग्णालयात  डाॅ. धर्मे यांनी उपचार करून जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. जखमींपैकी श्रावणी गजोबार व विजया शिरवलकर यांची प्रकृती अधिक गंभीर आहे.दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्ष संजय चव्हाण, उपनगराध्यक्षा संपदा राणे व नगरसेवकांच्या उपस्थितीत नगरपंचायतीने दुपारी श्वान पकडण्यासाठी मोहीम राबविण्यास सुरुवात केली. परंतु श्वान पकडण्यासाठी देवगडहून दाखल झालेले पथक किती दिवस थांबणार हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :dogकुत्राsindhudurgसिंधुदुर्ग