शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

पालीजवळ अपघातात सात ठार

By admin | Updated: February 8, 2017 22:50 IST

सर्व मृत तरुण मुंबईचे : एक गंभीर जखमी; कार झाडावर आदळून घडली दुर्घटना

रत्नागिरी : मुंबई येथून फिरण्यासाठी गोव्याकडे जाणाऱ्या सात तरुणांचा प्रवास अर्ध्यातच संपला. त्यांच्या झायलो कारला भीषण अपघात होऊन हे तरुण जागीच ठार झाले. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील पालीजवळील खानू येथे बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात एकजण गंभीर जखमी असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे उपचार सुरू आहेत.अपघातातील मृतांची नावे - अक्षय शंकर केरकर - चालक (२४, अमोघ सोसायटी, शिवाजीनगर, विलेपार्ले, मुंबई), सचिन विश्वनाथ सावंत (३१, नरेशकुंज, भालेकरवाडी, विलेपार्ले, मुंबई), मयूर वामन बेळणेकर (२८, कुलकर्णी चाळ, विलेपार्ले मुंबई), केदार बंडू तोडकर (२६, जुलेखाबाई चाळ, शिवाजीनगर, विलेपार्ले, मुंबई), वैभव दामोदर मनवे (सिद्धिविनायक सोसायटी, शिवाजीनगर, विलेपार्ले, मुंबई), निहार सुधाकर कोटियन (चंद्राबाई आश्रम चाळ, शिवाजीनगर, विलेपार्ले, मुंबई), प्रशांत जगन्नाथ गुरव (३१, सिद्धिविनायक सोसायटी, विलेपार्ले मुंबई) अशी आहेत.हे सर्व तरुण २५ ते ३५ या वयोगटातील असून, ते मुंबई-मालाड व विलेपार्ले या भागातील आहेत. ते गोव्याला जाण्यासाठी रात्री १२.३० नंतर मुंबईहून निघाल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी सकाळी ७.३० च्या दरम्यान कार पालीजवळील खानू या गावी बसस्टॉपच्या पुढील बाजूस फणसाच्या झाडावर जोरदार आदळली व त्यानंतर रस्त्यालगतच्या १० ते १२ फूट खोल गटारात जाऊन कलंडली. ही धडक एवढी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज एवढा मोठा होता की, तो महामार्गावरील आजूबाजूच्या वस्त्यांपर्यंत पोहोचला व धुळीचे कण आकाशात उडाले. त्यामुळे काही क्षण महामार्गावर भीषण स्फोट झाल्याचा अंदाज बांधून ग्रामस्थ या ठिकाणी मदतीसाठी धावले. अपघाताची भीषणता पाहता सकाळच्या थंडीतही अनेकांना घाम फुटला.कार चक्काचूर झाल्यामुळे त्यातील सर्व प्रवासी अडकून पडले होते व रक्ताचा सडा पूर्णत: गाडीभर पडल्याने जखमींची अवस्था अतिगंभीर दिसत होती. मात्र, यातूनही पुढील बाजूस चालकाच्या बाजूला बसलेला अभिषेक कांबळी (नारायण पटेल बाग, शिवाजीनगर, विलेपार्ले, मुंबई) याला ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने वाहनातून प्रथम बाहेर काढून प्रथमोपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.कारमधील उर्वरित तरुणांना बाहेर काढण्यासाठी जवळपास दीड तासाचा कालावधी लागला. या भीषण धडकेमध्ये कारचे दरवाजे लॉक झाले. (पान ८ वर)‘डान्स इंडिया डान्स’च्या मेकअपमनचा समावेशया अपघातात मृत्युमुखी पडलेला प्रशांत गुरव हा डान्स इंडिया डान्स या टीव्ही शोचा मेकअपमन होता. त्याची बहीण सावंतवाडी येथे राहते. तिला भेटून हे सर्वजण गोव्याला फिरण्यासाठी जाणार होते. दुर्दैवाने अर्ध्या रस्त्यातच त्यांचा प्रवास कायमस्वरूपी संपला.अपघातात गाडीचे दरवाजे लॉक झाले. टप पूर्णपणे चेपून गेल्यामुळे सर्व तरुण गाडीतच अडकून पडले होते. अखेर क्रेनच्या सहाय्याने मृतांना बाहेर काढले.