काळा पैसा रोखण्यासाठी ७ गुप्तचर संस्था स्थापणार

By Admin | Updated: January 4, 2015 22:12 IST2015-01-04T22:12:18+5:302015-01-04T22:12:18+5:30

काळ्या पैशांच्या व्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी तसेच सीमा शुल्काबाबत होणारी फसवणूक रोखण्यासाठी विदेशात ७ गुप्तचर संस्था स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला

To set up seven intelligence agencies to stop black money | काळा पैसा रोखण्यासाठी ७ गुप्तचर संस्था स्थापणार

काळा पैसा रोखण्यासाठी ७ गुप्तचर संस्था स्थापणार

माणगाव : माणगाव खोऱ्यात हत्तींकडून चालू असलेल्या नुकसानीबाबत वनविभागाने हत्ती प्रशिक्षण मोहीम राबविण्याची तयारी पूर्ण झाली आहे. या मोहिमेसाठी हत्तींना पकडून ज्या क्रॉलमध्ये बंदिस्त करण्यात येणार आहे, त्या क्रॉलचे काम शनिवारी पूर्ण करण्यात आले आहे. गुंगीची औषधेही वनविभागास प्राप्त झालेली आहेत. त्यामुळे ही मोहीम लवकरात लवकर राबवावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे वनविभागही या मोहिमेची तयारी युद्धपातळीवर करीत आहे.
माणगाव खोऱ्यात हत्तींकडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे. वर्षानुवर्षे उत्पन्नाचे साधन असणारे माड हत्ती उन्मळून टाकत आहेत. भातपिकाचीही नासधूस सुरू आहे आणि शेतकऱ्यांच्या जीविताशी खेळही चालविला आहे. त्यामुळेच हत्ती प्रशिक्षण मोहीम राबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यापूर्वी हत्ती हटाव मोहीम हत्तीच्या जिवावर बेतली असल्याने वनविभागाने कर्नाटकातील वनविभागाचे माहूत आणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हत्ती प्रशिक्षण मोहीम निश्चित केली आहे. माणगाव खोऱ्यातील वनविभागाच्या आंबेरी येथील क्षेत्रात निलगिरीच्या भल्यामोठ्या वृक्षांपासून हत्तींना बंदिस्त करण्यासाठीचे क्रॉल बांधण्यात आले आहेत. या क्रॉल बांधणीसाठी कर्नाटक येथील वनविभागाचे माहूत मनवर पाशा यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू असून, क्रेनच्या साहाय्याने भलीमोठी लाकडे वापरण्यात आली आहेत. जेणेकरून हत्ती बिथरला, तरी त्याला या क्रॉलमुळे कोणतीही हालचाल न करता निमूटपणे प्रशिक्षण घेणे भाग पडेल. या क्रॉल बांधणीसाठी वनविभागाचे वनरक्षक वैशाली वाघमारे, वनसेवक गोविंद सावंत, शंकर लाड, रामचंद्र तेली, अशोक कविटकर, यशवंत आगलावे, संतोष इब्रामपूरकर व शंकर पाडावेही कार्यरत आहेत. या क्रॉल बांधणीसाठी मालवण येथून निलगिरी वृक्ष आणण्यात आले आहेत. तसेच क्रॉलच्या बाजूला पाण्याची सुविधा, पुरेसा उजेड, रात्रीच्यावेळी लाईटव्यवस्था, हत्तींसाठीचे खाद्य याची पुरेपूर तयारी करून ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)


मोहिमेस विविध स्तरांवरून पाठिंबा
हत्तींना बेशुद्ध करून या क्रॉलमध्ये बंदिस्त केले जाणार आहे. त्यानंतर सुमारे चार महिने या हत्तींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर पर्यटनासाठी या हत्तींचा वापर करण्यात येणार असल्याने वनविभागाच्या या मोहिमेस सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. सध्या माणगाव-बेनवाडी येथे एका टस्कराकडून शेतकऱ्यांच्या माड-बागायतींचे नुकसान केले जात असल्याने नुकसान थांंबविण्यासाठी ही मोहीम लवकरात लवकर राबवावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

Web Title: To set up seven intelligence agencies to stop black money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.