शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५५ आरोग्य उपकेंद्रांवर सेवा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 18:07 IST

sindhudurg Health News- जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील ५५ आरोग्य उपकेंद्रांवर आता आरोग्य सेवा मिळणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तेथे बीएएमएस किंवा बीएससी नर्सिंग डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ग्रामीण भागात ५५ आरोग्य उपकेंद्रांवर सेवा मिळणार इन कॅमेरा समुपदेशन : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत डॉक्टर उपलब्ध

ओरोस : जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील ५५ आरोग्य उपकेंद्रांवर आता आरोग्य सेवा मिळणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तेथे बीएएमएस किंवा बीएससी नर्सिंग डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. यासाठी इन कॅमेरा समुपदेशन पद्धत राबविण्यात आली. समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून हे नियुक्ती मिळालेले कर्मचारी काम करणार आहेत.ग्रामीण भागातील उपकेंद्र स्तरावर आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने बीएमएस किंवा बीएससी नर्सिंग कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार यापूर्वी ९५ समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.

नव्याने ८ महिन्यांपूर्वी अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी राज्यस्तरावरील सहा महिन्यांचे प्रशिक्षण जिल्हा रुग्णालयात घेण्यात आले होते. या प्रशिक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ६० उमेदवार दाखल झाले होते. यानंतर घेण्यात आलेल्या परीक्षेत जिल्ह्यातील ५६ उमेदवार उत्तीर्ण झाले होते.परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड करून राज्य शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला यादी कळविली होती. या यादीनुसार पात्र उमेदवारांना उपकेंद्रे निश्चित करून समुपदेशन पद्धतीने नियुक्ती देण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले होते.त्यानुसार जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया इन कॅमेरा पार पडली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे उपस्थित होते. पात्र ठरलेले ५६ पैकी ५५ उमेदवार उपस्थित राहिले होते. त्या सर्वांना नियुक्ती देण्यात आली.प्रशासनाची गरज लक्षात घेऊन यादीसमुपदेशन पद्धत राबविण्यापूर्वी आरोग्य विभागाने जिल्ह्यातील कोणत्या उपकेंद्राला समुदाय आरोग्य अधिकाऱ्याची  गरज आहे ? याची यादी तयार केली होती. ती यादी पात्र उमेदवारांसमोर ठेवून इन कॅमेरा समुपदेशन करण्यात आले. यादीतील उपकेंद्राप्रमाणे मागणी केलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्यsindhudurgसिंधुदुर्ग