शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Sindhudurg: खारेपाटण येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूने होणार सर्व्हिस रस्ता

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 25, 2025 17:15 IST

महामार्गालगत असलेल्या विद्युत, जल वाहिन्यांचे होणार स्थलांतर

संतोष पाटणकरखारेपाटण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण या गावात महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुद्धा रस्त्याच्या दोन्ही बाजूने अत्यावश्यक असणाऱ्या सर्व्हिस रस्त्याचे काम भूसंपादन करण्यात आले असताना देखील अपूर्ण ठेवण्यात आले होते. आता मात्र या अपूर्ण असलेल्या सर्व्हिस रोड चे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असून याबाबत महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने संबधित खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित संभाव्य सर्व्हिस रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यात आली.यावेळी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणाचे प्रतिनिधी जाधव, महाराष्ट्र राज्य विद्युत विभगाचे खोत, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग खारेपाटण उपविभागिय कार्यालयाचे अभियंता बी. जी. कुमावत, खारेपाटण ग्रामविकास अधिकारी जि.सी. वेंगुर्लेकर आदी प्रमुख पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.खारेपाटण येथील मुंबई - राष्ट्रीय महामर्गावरील बांधकाम विभागाचे कार्यालय ते खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन रोड ब्रीजपर्यंत ते पुढे मधुबन हॉटेल ते संभाजीनगर बस स्टॉप पर्यंत सर्व्हिस रस्त्याचे काम करण्यात येणार असून खारेपाटण पीक अप शेडवरचे स्टँड बस थांबा ते संभाजीनगर गुरववाडी खारेपाटण येथेपर्यंत सर्व्हिस रस्ता होणार आहे. या कामामध्ये बाधित होणाऱ्या जल व विद्युत वाहिनी स्थलांतरित करण्यात येणार असून त्याचे अंदाजत्रक तयार करून संबंधित खात्यांना पाठविण्यात येणार आहे.

यापूर्वीच भूसंपादन, नवीन भूसंपादन नाहीसुमारे २ किलो मिटर लांब व साडे पाच फूट रुंद असा महामार्गाच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड करण्यात येणार आहे. तर खारेपाटण येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूने होणाऱ्या या सर्व्हिस रोड करीता महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने या पूर्वीच भू संपादन करण्यात आलेले असून नव्याने भू संपादन करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. तर या सर्व्हिस रोड मुळे खारेपाटण महामार्गावरील होणारे अपघात कमी होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्ग