सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात नेमबाजांची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 04:57 PM2021-11-12T16:57:11+5:302021-11-12T16:59:27+5:30

सिंधुदुर्ग :  नुकत्याच गुजरात अहमदाबाद येथे पार पडलेल्या ऑल इंडिया जी. व्ही. मावळणकर नेमबाजी स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले ...

Selection of seven shooters from Sindhudurg district for National Shooting Competition | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात नेमबाजांची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात नेमबाजांची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड

Next

सिंधुदुर्ग :  नुकत्याच गुजरात अहमदाबाद येथे पार पडलेल्या ऑल इंडिया जी. व्ही. मावळणकर नेमबाजी स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते. त्यातील सात नेमबाजांची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


यात 10 मी. एअर पिस्तूल प्रकार सबयुथ गटात कु. साहिश दिगंबर तलनकर (दोडामार्ग) याने ४०० पैकी 370  गुण मिळविले तर याच गटात सहभागी झालेला आयुष दत्तप्रसाद पाटणकर (सावंतवाडी) याने ४०० पैकी ३४८ गुणांची नोंद केली. युथ गटात स्वानंद प्रशांत सावंत (सावंतवाडी) याने 355 गुणांसह यशस्वी कामगिरी केली. हे सर्व खेळाडू दिल्ली येथे दिनांक १८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये सहभागी होतील.


तर, १० मी. एअर रायफल प्रकारात सब युथ गटात कु. संजना अमोल बीडये (सावंतवाडी) हिने ४०० पैकी ३७७ गुण व वैष्णवी गोविंद भांगले (बांदा) हिने ३७० तर मुलांच्या गटात शमित श्याम लाखे (सावंतवाडी) याने ३६७ गुणांची नोंद केली. रायफल प्रकारातील राष्ट्रीय स्पर्धा ही भोपाळ येथे दिनांक २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. हे सर्व खेळाडू महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करतील.


तसेच या राष्ट्रीय स्पर्धेसाठी  यापूर्वीच आंतरराष्ट्रीय खेळाडू अतुल लक्ष्मण नाखरे याची निवड गोवा राज्य संघातून  झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणारे नेमबाज भारतीय निवड चाचणीसाठी पात्र ठरतील. वरील सर्व निवड झालेले खेळाडू उपरकर शूटिंग रेंज सावंतवाडी व बांदा येथे सराव करत असून त्यांना प्रशिक्षक कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण लाभले तसेच आंतरराषट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले यांचे मार्गदर्शन मिळाले. भांगले यांची निवड भोपाळ येथील स्पर्धेसाठी चीफ रेंज ऑफीसर आणि जुरी म्हणून राष्ट्रीय नेमबाजी संघटनेने केली आहे. सर्व निवड झालेल्या खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Selection of seven shooters from Sindhudurg district for National Shooting Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.