शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पाहून आयर्लंडचे पंतप्रधान लिओ म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 12:57 IST

सोमवारी सकाळी मालवण नगरपरिषदेलाही त्यांनी भेट दिली.

सिंधुदुर्ग - भारतात मी यापूर्वी पाचवेळा आलो आहे. मात्र, माझे आजोबा, वडील राहत असलेल्या वराड गावी येण्याचा योग पहिल्यांदाच आला असून गावात येऊन मला अतिशय आनंद झाला. माझे आडनाव या गावाशी जोडले आहे, याचाही आनंद असून आम्ही वराडकर कुटुंबीय गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास आयर्लंडचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांनी वराड (ता. मालवण) येथे व्यक्त केला. तर, बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा पाहून 'ही इज शिवसेना लिडर' असा उल्लेख आपसूकच त्यांच्या तोडून निघाला. 

पतंप्रधान लिओ वराडकर यांनी शासकीय पातळीवर दौऱ्याचे आयोजन न करता घरगुती स्तरावर खासगी दौरा केला. कोणत्याही शासकीय यंत्रणेला या दौऱ्याची कल्पना नव्हती, असे चित्र होते. रविवारी सकाळी सिंधुदुर्गातील मालवण वराड या गावी ‘वरदश्री’ या निवासस्थानी लिओ वराडकर व कुटुंबीयांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. डॉ.लिओ वराडकर यांनी येथील मालवणी जेवणाचाही आस्वाद घेतला.  त्यानंतर गावात आंबा काजू बागेत फेरफटका मारला. गावातील शाळेत विध्यार्थ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. गावातील वेताळ मंदिर व कट्टा येथील चर्चलाही त्यांनी भेट दिली. वराड येथे आपल्या निवासस्थानी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. 

सोमवारी सकाळी मालवण नगरपरिषदेलाही त्यांनी भेट दिली. त्यावेळी सभागृहात विविध राष्ट्रीय नेतेमंडळी यांच्या प्रतिमा त्यांनी पहिल्या. त्यात शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेकडे बोट दाखवत ‘ही इज शिवसेना लीडर’ असे उद्गार पंतप्रधान लिओ वराडकर यांनी काढले. विशेष म्हणजे बालपणापासून त्यांचा येथील मातीशी फारसा संबंध नाही, तरीही त्यांनी बाळासाहेबांचा फोटो पाहून त्यांची ओळख पटवल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. त्यानंतर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व नगरसेवक नितीन वाळके यांच्याकडून पंतप्रधान वराडकर यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत अधिक माहिती जाणून घेतली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्या हस्ते लिओ यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, या दौऱ्यात त्यांची चुलत बहीण शुभदा वराडकर यांनी दुभाषिकांची भूमिका बजावली. 

टॅग्स :Irelandआयर्लंडBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेनाprime ministerपंतप्रधानsindhudurgसिंधुदुर्ग