सायन्स एक्स्पो कार्यक्रम कौतुकास्पद
By Admin | Updated: January 8, 2015 00:04 IST2015-01-07T20:55:03+5:302015-01-08T00:04:46+5:30
जय सामंत : वेताळबांबर्डे शिक्षण प्रसारक मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष

सायन्स एक्स्पो कार्यक्रम कौतुकास्पद
कुडाळ : नवीन संशोधक व वैज्ञानिक निर्माण व्हावेत, या हेतूने शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालयाने आयोजित केलेला ‘सायन्स एक्स्पो’ हा कार्यक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन डॉ. जय सामंत यांनी केले. वेताळबांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय आणि बाबासाहेब वेंगुर्लेकर सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालय या शैक्षणिक संकुलाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयात ‘सायन्स एक्स्पो’ चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. सामंत बोलत होेते. यावेळी प्रमुख पाहुणे सिंहगड इन्स्टिट्युटचे प्राचार्य डॉ. एस. एन. माळकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाली. प्रास्ताविकात प्राध्यापक गुरूप्रसाद अणावकर यांनी सायन्स एक्स्पोचा हेतू विषद केला. यावेळी डॉ. एस. एन. माळकर यांनी वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने ५० वर्षात शैक्षणिक कार्यात जे योगदान दिले व सायन्स एक्स्पोसारख्या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केल्याबाबत गौरवोद्गार काढले. महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. नंदन सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थाध्यक्ष शशिकांत अणावकर यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्था सचिव आपा गावडे, उपकार्याध्यक्ष प्रकाश जैतापकर, संचालक सुबी अणावकर, रवींद्र कांदळकर, रिना सावंत आदी उपस्थित होते. या सायन्स एक्स्पोमध्ये ५९ प्रकल्पांचा सहभाग होता. जिल्ह्यातील विविध शाळांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला. याप्रसंगी डॉ. अनुराधा सामंत यांचे ऊर्जा संवर्धन व ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर व्याख्यान झाले. पारितोषिक वितरण शशिकांत अणावकर यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमास सहभागी विद्यार्थी व शिक्षक, प्रशालेचे शिक्षक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘सायन्स एक्स्पो’ कार्यक्रमाच्या प्रारंभप्रसंगी प्राचार्य डॉ. एस. एन. माळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. नंदन सामंत, शशिकांत अणावकर आदी उपस्थित होते.