शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यासाठी गर्दी, लांबच रांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 19:01 IST

Coroanavirusunlock, teacher, sindhudurgnews ,educationsector, गेले आठ महिने बंद असलेल्या माध्यमिक शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी मोहीम १८ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. कणकवली तालुक्यातील ही चाचणी कणकवली शासकीय विश्रामगृहात होत आहे. १८ ते २२ नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत तालुक्यातील एकूण ३६६ कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यासाठी गर्दी, लांबच रांग २३ नोव्हेंबरला शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना तपासणी मोहीम सुरू

तळेरे : गेले आठ महिने बंद असलेल्या माध्यमिक शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी मोहीम १८ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. कणकवली तालुक्यातील ही चाचणी कणकवली शासकीय विश्रामगृहात होत आहे. १८ ते २२ नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत तालुक्यातील एकूण ३६६ कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात येणार आहे.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड १९ची चाचणी मोहीम जिल्हाभर सुरू आहे. कणकवली तालुक्यातील माध्यमिक शाळेतील कर्मचाऱ्यांच्या कोविड चाचणीचा प्रारंभ १८ नोव्हेंबरपासून झाला आहे. तालुक्यातील ३१ शाळांमधील ३०० शिक्षक व ६६ शिक्षकेतर कर्मचारी मिळून ३६६ कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करण्यात येणार आहे.

गुरुवारपर्यंत करंजे, घोणसरी, नांदगाव, करुळ, हडपीड, एस. एम. हुंबरठ, आदर्श विद्यामंदिर सावडाव, कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तळेरे हायस्कूल, एन. व्ही. मालंडकर कॉलेज, विद्यामंदिर हायस्कूल आदी शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. उर्वरित २० शाळांच्या चाचण्या पुढील तीन दिवसांत घेतल्या जाणार आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी लेखी दिली आहे.शाळेत विविध ठिकाणचे विद्यार्थी येणार आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची चाचणी महत्त्वाची नसून त्यांना निव्वळ काही नियम व अटींचे बंधन घालण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थी सुरक्षित कसे राहू शकतील? केवळ कर्मचाऱ्यांची चाचणी करून विद्यार्थी सुरक्षित कसे राहू शकतात? असा प्रश्न अनेक कर्मचाऱ्यांना पडला आहे.चाचणी बंधनकारककणकवली शासकीय विश्राम गृहाबाहेर सकाळपासून कर्मचाऱ्यांच्या रांगा लागलेल्या असतात. लॉकडाऊन काळात सर्व यंत्रणा बंद होती. त्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यानुसार २३ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ही चाचणी करणे बंधनकारक आहे. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकTeacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग