शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीत आंतरराष्ट्रीय स्कूलसाठी हालचाली, मंत्री केसरकरांकडून जागेची पाहणी

By अनंत खं.जाधव | Updated: July 10, 2023 17:58 IST

या कामाला तब्बल 31 कोटीचा निधीही शासनाकडून मंजूर करण्यात आला

सावंतवाडी : आंबोली गेळे येथे महाराष्ट्र शासनाच्यावतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय स्कूल उभे करण्यात येणार आहे. या स्कूलच्या जागेची पाहणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी अधिकाऱ्यांसमवेत केली. अजून एक दोन जागा बघितल्यानंतर जागेचा अंतिम निर्णय घेण्यात येईल असेही यावेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी व्ही. एन. नाईक, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, आंबोली सरपंच सारीका पालयेकर, संतोष पालयेकर, विलास गावडे, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, बबन राणे आदी उपस्थित होते.लोणावळा, पाचगणीच्या धरतीवर आंबोली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेताजी सुभाष चंद्र बोस स्कूल उभे करण्याचा मंत्री केसरकर यांचा मानस आहे. याठिकाणी निवास व्यवस्था ही करण्यात येणार आहे. या कामाला तब्बल 31 कोटीचा निधीही शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे.शाळेचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे या दृष्टीने मंत्री केसरकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत गेळे येथील जागेची पाहणी केली. मात्र गेळे येथील जागेवर अद्याप पर्यंत एकमत झाले नाही. त्यामुळे आणखी दोन ते तीन जागेची मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना पाहाणी करण्यास सांगण्यात आले असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अहवाल शासनाला प्राप्त झाल्यानंतर जागेबाबत निश्चिता होईल असे केसरकर यांनी सांगितले. दरम्यान मंत्री केसरकर यांचा गेळे येथील शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मुलांना ही केसरकर यांच्या हस्ते पुस्तके देण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Internationalआंतरराष्ट्रीयSchoolशाळा